ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय?

संगणक वापरण्यासाठी ज्याप्रकारे वापरकर्ता (User), हार्डवेअर (Hardware), पध्दती (Manual) व डेटा (Data) आवश्यक असते त्याच प्रकारे सॉफ्टवेअर (Software) देखिल आवश्यक असतात. सिस्टीम आणि ऍप्लीकेशन असे सॉफ्टवेअर मुख्य दोन प्रकार पडतात. संपुर्ण संगणक यंत्रणा वापरण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम सारख्या सिस्टीम सॉफ्टवेअरची आवश्यकता असते.

Operating System in Marathi Information या ब्लॉगच्या माध्यमाने ऑपरेटिंग सिस्टीम संदर्भात प्राथमिक परंतू महत्वाची माहिती घेणार आहोत, तर चला सुरु करुयात…

Operating System in marathi mahiti

ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय? | Operating System in Marathi

कार्यकारी यंत्रणा म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम याला लघुरुपा मध्ये ओ.एस. (OS-Operating System) असे देखिल म्हणतात. ऑपरेटिंग सिस्टीम एक प्रकारचे सॉफ्टवेअर आहे जो संपुर्ण संगणक वापरण्यासाठी सचित्र आणि कमांड लाईन इंटरफेस प्रदान करते. ऑपरेटिंग सिस्टीमचे मुख्य कार्य संपुर्ण संगणक यंत्रणा सतत चालू ठेवण्याचे असते. संगणकाच्या हार्ड-डिस्क स्टोरेज मध्ये याची स्थापना (Install) केली जाते.

ऑपरेटिंग सिस्टीम अनेक प्रोग्रामचा समुह असतो. संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, सुरक्षा, मेमरीचे आणि नेटवर्क सारख्या कितीतरी कार्यांचे व्यावस्थापन आणि नियंत्रण करण्याचे कार्य ऑपरेटिंग सिस्टीम मार्फत पुर्ण केले जाते. संगणक वापरकर्ता आणि संगणक या दोन्ही घटका मधील ऑपरेटिंग सिस्टीम दुवा म्हणुन महत्वाचे कार्य करत असतो.

ऑपरेटिंग सिस्टीम कोणते कार्य करते? | How work Operating System?

ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे अनेक प्रक्रिया, डेटाचे, डिव्हाईस, सुरक्षा संदर्भात नियंत्रण आणि व्यावस्थापनाचे कार्य अनेक स्तरावर पार पाडली जातात. संगणक वापरकर्ता आणि संगणक मध्ये दुवा म्हणुन ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य महत्वाचे आहे. संपुर्ण संगणक यंत्रणा वापरण्याच्या सक्षम स्थिती मध्ये सतत कार्यरत असणे महत्वाचे आहे आणि हे ऑपरेटिंग सिस्टीमचे महत्वाचे वैशिट्ये आहे.

Characteristics of Operating System

1. प्रक्रिया व्यावस्थापन (Process Management)

ऑपरेटिंग सिस्टीम मार्फत अनेक प्रक्रिया पुर्ण केल्या जातात. संगणक सुरक्षा, ऍप्लीकेशन टास्क, नेटवर्क, डिव्हाईसचा उपयोग आणि नियंत्रण अश्या अनेक प्रक्रिया निर्मान करणे, थांबवणे आणि संगणकाच्या क्षमतेनुसार प्रक्रियांचा क्रम निश्चीत करणे असे कार्य ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे पुर्ण केले जाते.

2. युजर इंटर फेस (User Interface)

युजर इंटर फेस म्हणजेच जि.यु.आय. (GUI-Graphical User Interface) होय. जि.यु.आय. ऑपरेटिंग सिस्टीमचा असा घटक आहे जो संपुर्ण संगणक आणि त्यांचे पर्याय सचित्र पद्धती मध्ये उपलब्ध करुन देण्याचे कार्य करतो. ऑपरेटिंग सिस्टीमचे सर्व कमांड आणि पर्याय तसेच घटक आयकॉन आणि चित्रांच्या स्वरुपात प्रस्तुत करतो ज्यामुळे संगणक हाताळणे सोपे जाते.

3. डिव्हाईस मॅनेजमेंट (Device Management)

संगणकाला अनेक हार्डवेअर म्हणजेच डिव्हाईसेस् जोडली जातात. जसे “सिस्टीम डिवाईसेस” आणि “प्लग-अन-प्ले (सहज जोडता आणि काढता येण्यास सक्षम)” डिव्हाईसचे व्यावस्थापन, नियंत्रण आणि त्यांचा उपयोग करण्याचे सुविधा ऑपरेटिंग सिस्टीम द्वारे पुर्ण केली जाते.

💡 संगणकाला माहिती/डेटा देणारे, डेटावर प्रक्रिया करणारे आणि प्रक्रिया केलेली माहिती प्रदान करणारी यंत्रणा ऑपरेटिंग सिस्टीम द्वारे नियंत्रित केली जाते. संगणकाला जोडलेली सर्व डिव्हाईसेस डेटा विभागुन वापरत असतात यामध्ये इनपुट आणि आऊटपुट नियंत्रक (I/O Controller) महत्वाची भुमिका पार पाडतात.

4. मेमरी मॅनेजमेंट (Memory Management)

संगणकाची मेमरी म्हणजेच स्मृतीस्थान याचे व्यावस्थापन ऑपरेटिंग सिस्टीम द्वारे नियंत्रित केले जाते. प्राथमिक मेमरी आणि दुय्यम मेमरीचे उपयोग आणि नियंत्रणासाठी ऑपरेटिंग सिस्टीम महत्वाचा दुवा आहे. रॅम, हार्ड डिस्क, सि.डी.-डि.व्ही.डी, पेन ड्राईव्ह… सारखे अनेक मेमरीचे प्रकार आहेत.

💡 मेमरीचा वापर वापरकर्ता ऑपरेटिंग सिस्टीमच्या माध्यमाने करत असतो. डेटा आणि ऍप्लीकेशन वापरणे, साठवणे आणि व्यावस्थापन म्हणजेच मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटिंग सिस्टीम द्वारे उपयोगात आणली जाते.

5. सुरक्षा (Security Management)

संगणकाची अनाधिकृत वापरापासुन प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षा प्रणालीचे व्यावस्थापन ऑपरेटिंग सिस्टीम द्वारे केले जाते. एँन्टी-व्हायरस, एँन्टी-मालवेअर, नेटवर्क सुरक्षा, फायरवॉल आणि डेटा सुरक्षा अश्या अनेक स्तरावर ऑपरेटिंग सिस्टीम सुरक्षा प्रदान करत असते.

6. फाईल मॅनेजमेंट (File Management)

संगणकामध्ये असलेली सर्व माहिती आणि सुचना फाईलच्या स्वरुपात संगणकामध्ये साठवलेल्या असते. फाईलचे व्यावस्थापन करणे ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे शक्य होतो. संपुर्ण ऑपरेटिंग सिस्टीम फाईलच्या स्वरुपात संगणकामध्ये साठवलेली असते. संगणकाच्या सुविधा वापरताना या फाईल आवश्यक असतात याला सिस्टीम फाईल असे म्हणतात.

💡 ऍप्लीकेशचा वापर करुन अनेक प्रकारच्या फाईल वापरतकर्ता तयार करत असतो तसेच इंटरनेटच्या माध्यमाने डाऊनलोड करून वापरत असतो. संगणकातील फाईलच्या स्वरुपात असलेला डेटाचे (File Management) व्यावस्थापन आणि उपयोग ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे शक्य होते.

प्रचलित ब्लॉग

ऑपरेटिंग सिस्टीम इंटरफेस काय आहे? | What is OS Interface?

1. सि.यु.आय. – कॅरेक्टर युजर इंटरफेस

सि.यु.आय. – कॅरेक्टर युजर इंटरफेस (CUI – Character User Interface) ऑपरेटिंग सिस्टीमचा इंटरफेस अक्षर, अंक आणि चिन्ह या सारख्या कॅरेक्टर वर आधारीत असतो. संपुर्ण काळ्या रंगाच्या मॉनिटर पटलावरती पांढ-या किंवा इतर रंगाच्या कॅरेक्टर सह संपुर्ण संगणक कमांड द्वारे वापरला जातो. ऍप्लीकेशन आणि कमांड कि-बोर्ड द्वारे टाईप करुन प्रविष्ट केले जाते तसेच या ओ.एस. मध्ये माऊसचा वापर सहसा केला जात नाही.

संगणकाने कोणते कार्य करावे? यासाठीच्या सुचना देण्याच्या पद्धतीला सि.एल.आय. म्हणजेच कमांड लाईन इंन्ट्रक्शन (CLI – Command Line Instruction) असे म्हणतात. कॅरेक्टर वर आधारीत असलेल्या या ऑपरेटिंग सिस्टीमला कॅरेक्टर युजर इंटरफेस ऑपरेटिंग सिस्टीम असे म्हणतात. उदा. MS-DOC

2. जि.यु.आय. – ग्राफिकल युजर इंटरफेस

जि.यु.आय. ग्राफिकल युजर इंटरफेस (GUI – Graphical User Interface) ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये संगणकाचा संपुर्ण इंटरफेस सचित्र म्हणजेच ग्राफिक्स् च्या स्वरुपात असतो. ऑपरेटिंग सिस्टीम आणि ऍप्लीकेशनचे सर्व भाग सचित्र घटकांनी दर्शवलेले असतात म्हणुन या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीमला ग्राफिकल युजर इंटरफेस असे म्हणतात.

फाईल, फोल्डर, ऍप्लीकेशन आणि कमांड सचित्र पद्धतीने दर्शवलेली असतात. आयकॉन ऑपरेटिंग सिस्टीमचा एक महत्वाचा घटक असतो जो प्रत्यके ऍप्लीकेशन आणि फाईलसाठी एक विशीष्ट ओळख म्हणुन कार्य करतो. उदा. विंन्डोज, मॅक ओ.एस.

ऑपरेटिंग सिस्टीमचे प्रकार? | Types of Operating System

1. बॅच ऑपरेटिंग सिस्टीम (Batch Operating System)

संगणकाला दिलेले कोणतेही कार्य करण्यापुर्वी बॅच ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे त्या कार्याचे अनेक लहान भागामध्ये विभाजन केले जाते. क्रमबद्ध असलेल्या आणि लहान-लहान समुहामध्ये (Batch) विभाजीत केलेल्या भागावरती मध्ये कार्य पुर्णत्वास नेले जाते.

2. मल्टी टास्कींग ऑपरेटिंग सिस्टीम (Multi Tasking Operating System)

एका संगणकावरती एका पेक्षा अनेक ऍप्लीकेशनवर कार्य करण्याची सुविधा या ऑपरेटिंग सिस्टीम द्वारे प्रदान केली जाते. मल्टी टास्कींग ऑपरेटिंग सिस्टीम वरती एका वेळी अनेक ऍप्लीकेशन विंन्डोवरती कार्य करणे शक्य होते.

प्रचलित 5 ऑपरेटिंग सिस्टीम | Top 5 Operating System

1. मायक्रोसॉफ्ट विंन्डोज (Windows Operating System)

मायक्रोसॉफ्ट द्वारा सुरवातीला संगणकासाठी MS-DOS ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली होती. सि.यु.आय. सि.यु.आय. (CUI – Character User Interface) तंत्रज्ञानावर आधारीत असलेली MS-DOS सिस्टीम मध्ये सर्व सुचना आणि कमांड देण्यासाठी कॅरेक्टर (शब्द, अंक आणि चिन्हांचा) पद्धीतीचा उपयोग होत असे. संपुर्ण संगणक वापरण्यासाठी सि.एल.आय. (CLI – Command Line Instruction) चा वापर करावा लागत असे.

मायक्रोसॉफ्ट संस्थेद्वारा संगणक ऑपरेटिंग सिस्टीमच्या क्षेत्रामध्ये अद्यावत आणि प्रगत सुधारणासह “विंन्डोज” नावाने (GUI – Graphical User Interface) सचित्र उपयोगावर आधारीत ऑपरेटिंग सिस्टीम प्रदर्शीत केली. डेस्कटॉप सारख्या मायक्रो संगणकासाठी एक क्रातीची सुरवात होती.

2. मॅक. ओएस. (Mac OS)

मॅकिंतोश या शब्दाचे लघुरुप मॅक असा होतो जे प्रसिद्ध वयक्तिक संगणक ऑपरेटिग सिस्टीम आहे. मॅक ओ.एस. (Mac OS) किंवा ओ.एस. एक्स. या नावाने प्रचलित असलेल्या ऑपरेटिंग सिस्टीमची रचना जगप्रसिद्ध ॲपल या संस्थेने केलेली आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या विंन्डोज ऑपरेटिंग सिस्टीम नंतर मॅक. ओ.एस. दुस-या क्रमांकावर सर्वात जास्त वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टीम आहे.

3. फिडोरा ओ.एस. (Fedora Operating System)

लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमच्या मुक्त आणि ओपन सोर्ड कोडद्वारे निर्माण केलेली फिडोरा ऑपरेटिंग सिस्टीम आहे. लिनीक्स द्वारा फिडोरा प्राजेक्ट आंतर्गत याची निर्मीती केली गेली. उद्यावत सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानचा समावेश हे याचे वैशिट्ये आहे.

2003 च्या सुरवातीस प्रसिद्ध ओपन सोर्स रेड हॅट लिनक्स प्रायोक्ताद्वारा फिडोरा लिनक्स प्राजेक्ट द्वारा वयक्तिक संगणकासाठी फिडोरा (Fedora OS) ऑपरेटिंग सिस्टीम नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सरासरी प्रत्येक सहा महिन्याच्या कालावधीत याचे नवीन आणि अद्यावत संस्करण उपलब्ध करुन देण्यात येते. व्हायरस सुरक्षा, ऑफिस ऍप्लीकेशन, सिस्टीम टुल्स, आणि मिडीया सारखी ऍप्लीकेशन नि:शुल्क प्रदान केली जातात.

4. ऊबंटू ओ.एस. (Ubuntu Operating System)

ऊबंटू ओ.एस. ची रचना “डेबियन” या संरचनेवर आधारीत आहे. लिनक्स ओ.एस. चे मुळ आणि उगम असलेल्या ऊबंटू ओ.एस. (Ubuntu OS) ऑक्टोबर 2004 मध्ये प्रथम संस्करण सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले. याची रचना लिनक्स वर आधारीत असल्यामुळे याला “ऊबंटू लिनक्स” असे देखिल म्हणतात.

ऊबंटू ओ.एस. चा इंटरफेस “जिनोम” संरचनेवर आधारीत असल्यामुळे वापरण्यास सोपा आहे तसेच सतत उपलब्ध होणारे अद्यावत संस्करणसह अनेक नविन वैशिट्यांचा वापरतात येतात. ऊबंटू ओ.एस. निशुल्क आहे त्यामुळे कोणीही याचा संगणाकरती वापर करु शकतो.

5. ॲन्ड्रॉइड ओ.एस. (Android OS)

ॲन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम गूगल संस्थेद्वारा खासकरुन मोबाईल डिव्हाईसाठी निर्मान करण्यात आली होती. ॲन्ड्रॉइड लिनक्स संरचनेवर आधारीत ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. प्रथमत: याची निर्मीती मोबाईल आणि टॅबलेट सारख्या टचस्क्रिन डिव्हाईसाठी करण्यात आलेली आहे. ऑक्टोबर 2008 मध्ये ॲन्ड्रॉइड ओ.एस. (Android OS) ची पहिली 1.0 आवृत्ती प्रदर्शीत करण्यात आलेली होती.

वापरण्यास सोपी, सुरक्षित आणि ॲप्लीकेशची उपलब्धता यामुळे अल्पावधीतच ॲन्ड्रॉइड एक लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टीमच्या श्रेणीत स्थान मिळवले. लोकप्रियता आणि वापर यामुळे मोबाईल सह टॅबलेट, वयक्तीक संगणक आणि लॅपटॉप (क्रोमबुक) साठी ॲन्ड्रॉइडच्या अनेक आवृत्ती उपलब्ध आहे.

सारांश (Conclusion)

ऑपरेटिंग सिस्टीमला मराठीमध्ये कार्यकारी यंत्रणा असे म्हणतात. ऑपरेटिंग सिस्टीमचे मुख्य कार्य संपुर्ण संगणक यंत्रणा सतत चालू ठेवण्याचे असते. संगणक डेटा, डिव्हाईस, मेमरी आणि सुरक्षा सारखी प्रक्रिया आणि स्त्रोत त्यांचे व्यावस्थापन आणि नियंत्रित करण्याचे कार्य ओ.एस. मार्फत केले जाते. ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय आपण संगणकाची कल्पना देख्रिल करु शकत नाहीत.

विंन्डोज, मॅक ओ.एस. ,फिडोरा, ऊबंटू आणि क्रोम ओ.एस. असे अनेक प्रसिद्ध संगणक ऑपरेटिंग सिस्टीम उपलब्ध आहेत. ऑपरेटिंग सिस्टीमची निवड पुर्णत: संगणक वापरकर्ताच्या गरजेनुसार ठरवली जाते.

शेअर करा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *