संगणक तंत्रज्ञानामध्ये झालेले विकास आणि संशोधन त्यामुळे मानवी जिवनामध्ये अग्रुमुल बदल होत आहेत. वयक्तिक, कार्यालयीन आणि व्यावासायीक अश्या अनेक क्षेत्रामध्ये संगणकाचा वापर वाढत आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही ज्या ठिकाणी संगणकाचा वापर होत नाही. इंटरनेट आणि संगणक हे आज एक मुलभूत गरज म्हणून समोर येत आहे.
वापरकर्ता संगणकाचा वापर त्याच्या उद्देश पुर्ण करण्यासाठी करत असतो. संगणक वापरण्यासाठी संगणकाची मुलभुत माहिती असणे आवश्यक असते. कि-बोर्ड, माऊस, मॉनिटर पुरते संगणक मर्यादित नाही त्यापेक्षाही आधिक पुढे जाऊन संगणकाची संपुर्ण माहिती असणे आवश्यक आहे. संगणकाचे कार्यक्षेत्र, तंत्रज्ञानामध्ये होणारे विकास, त्याच्या वापरण्याच्या पद्धती, त्यामुळे मानवी जिवनावर होणारे बदल या सर्वांची माहिती असणे देखिल आवश्यक आहे.
संगणक म्हणजे काय? (What is Computer in Marathi), संगणक कसे कार्य करतो?, संगणक विकासाचे अनेक कालखंड आहे प्रत्येक कालखंडामध्ये संगणक तंत्रज्ञान कसे होते? संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर… अश्या अनेक विषयांची माहिती या ब्लॉगच्या माध्यमाने सोप्या आणि सहज लक्षात येईल या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो या विषयीची दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल.
अनुक्रमनिका
संगणक म्हणजे काय? – What is Computer in Marathi?
गणनक्रिया, तर्क आणि माहिती (Calculation, Logic and Data) वर प्रक्रिया करणारे उपकरण म्हणजेच संगणक होय. आय.सी.-इंटिग्रेटेड सर्किट, ट्रान्झिस्टर, डायोड सारख्या विजेवर कार्य करण्या-या घटकांचा संच म्हणुन संगणकाला इलेक्ट्रॉनिक उपकरण देखिल म्हण्टले जाते. संगणकामध्ये वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक घटक विजप्रवाह नियंत्रित करतात तसेच माहिती/डेटाचे वहन व प्रक्रिया करण्यास सहाय्य करत असतात.
संगणक अनेक हार्डवेअरचा संच आहे जो डोळयांनी पाहु शकतो किंवा स्पर्शाने जाणवु शकतो. संगणकाचे कार्यपद्धती समजण्यासा सोपी जावी यासाठी संगणक हार्डवेअरचे वर्गीकरण आदान, प्रक्रिया आणि प्रदान साधने याद्वारे वर्गीकरण केले जाते.
संगणक यंत्रणा कार्यरत करणारा दुसरा महत्वाचा घटक सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअर संगणकाचा न दिसणारा परंतु संगणकाने कोणते कार्य करावे याची आज्ञा देणारा सुचनांचा संच आहे. हार्डवेअर साधनांचे संचालन आणि नियंत्रण सॉफ्टवेअर द्वारे परीपुर्ण होतो. माहितीवर प्रक्रिया करणारे हार्डवेअरचा आणि सॉफ्टवेअरचे समन्वय म्हणजेच संगणक होय. संगणक अनेक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा संच आहे.
संगणक वापरकर्त्याने दिलेली माहिती आणि सुचनेनुसार प्रक्रिया केलेली माहितीचे अंतिम निष्कर्श (Information) प्रदान करतो. संगणक प्रक्रिया करण्यासाठी अनेक विभाग (Unit) आणि साधनांचा (Device or Hardware) वापर करत असतो. जसे वापरकर्ता किंबोर्ड द्वारे अक्षरे टाईप करतो सि.पी.यु. त्या डेटावर प्रक्रिया करतो आणि शेवटी प्रक्रिया केलेल्या माहितीचे अंतिम परीणाम मॉनीटर द्वारे प्रदान करतो जे माहितचे अंतिम स्वरुप असते.
संगणक भाषा आणि नंबरसिस्टीम – Computer Number System
संगणकाची सर्व कार्य अंकशास्त्र भाषेचा वापर करुन पुर्ण होतात. अंकाना इंग्रजीमध्ये डिजीट असे म्हणतात म्हणुन अंकशास्त्र पद्धत नुसार डेटा प्रक्रिया केला जातो म्हणुन संगणकाला डिजीटल कॉम्प्युटर देखिल म्हणतात. संगणकाला दिली जाणारी माहिती “बायनरी” अंकशास्त्र पद्ध्तीमध्ये असते. बायनरी वयक्तिक संगणकासाठी वापरली जाणारी भाषा आहे.
द्विमान (Binary), अष्टमान (Octal), दशमान (Decimal) आणि हेक्साडेसिमल (Hexadecimal) या प्रचलित संगणक भाषा पद्धती आहेत. परंतु वयक्तिक संगणकामध्ये द्विमान भाषा (Decimal) पद्धतीचा वापर केला जातो.
- द्विमान (Binary) – 0 आणि 1
- अष्टमान (Octal) – 0 ते 7
- दशमान (Decimal)– 0 ते 9
- हेक्साडेसिमल (Hexadecimal) – 0 ते 9 अंक आणि A ते F पर्यंतचे अल्फाबेट
बायनरी मध्ये डेटा किंवा माहिती 0 आणि 1 च्या स्वरुपात दिली आणि स्विकारली जाते किंवा प्रक्रिया केली जाते. बायनरी नंबर सिस्टीम मध्ये 0 आणि 1 या दोन नंबर (Digit) चा वापर होतो म्हणुन याला द्विमान नंबर सिस्टीम असे म्हणतात. 0 आणि 1 संख्येला बिट असे म्हणतात. आठ अंकाच्या एकत्रित समुहाला बाईट असे म्हणतात.
उदा. 1 Byte= 8 Bit (01001001) एक बाईट माहितीचे पुर्ण एकक असतो. अर्थात कोणतेही माहिती पुर्ण होण्यासाठी 8 बिटचा समुह एकत्रित असणे गरजेचे असते. 0 बिटच्या स्वरुपाला बंद आणि 1 बिटला चालू अश्या संकेतामध्ये माजले जाते. बंद आणि चालु संकेताचे क्रमनुसार डेटा प्रक्रिया केला जातो.
अल्गोरिदम काय असते? – Computer Algorithm in Marathi
तर्क, गणिती क्रिया आणि प्रक्रिया करण्यासाठी ज्या क्रमबद्ध पद्धतीचा उपयोग समस्यांचे समाधान शोधण्यासाठी केला जातो त्याला अल्गोरिदम असे म्हणतात. अल्गोरिदम एक प्रकारच्या पायरीसदृश्य सुचना असतात जे क्रमबद्ध (Step-by-step) पद्धीतने समस्यांचे समाधान किंवा परीणाम प्राप्त करण्यासाठी वापरले जाते. अल्गोरिदम अचुक परीणाम मिळवण्याची उपयुक्त पद्धत आहे.
संगणक अल्गोरिदम प्रश्नांची किंवा समस्यांचे अनेक पायरीवर वेगवेगळ्या मार्गाने माहितीचे विश्लेषण करण्याचे कार्य करतो. आज्ञेच्या सुरवाती पासुन ते अंतिम पायरी पर्यंतचे दिशा निर्देश यामध्ये समाविष्ट केलेली असतात. प्रत्यके पायरीवर माहिती कश्या पद्धतीने तपासायाची आणि प्रत्येक पायरीचे कार्य पुर्ण करुन निष्कर्ष प्रदान करण्याचे दिशानिर्देश अल्गोरिदम द्वारे निश्चीत केले जाते.
थोडक्यात संगणकाला दिलेल्या आज्ञा कश्या पद्धतीने कार्यान्वीत कराव्यात किंवा कार्य करावे याची तर्कशुद्ध पद्धत म्हणेजच अल्गोरिदम होय.
कोणतेही संगणक प्रोग्राम तयार करण्यापुर्वी अल्गोरिदमची रचना करणे आवश्सक असते. प्रोग्राम अल्गोरिदम पद्धतीने पायरीसदृश्य आणि क्रमबद्ध रीतीने आमलांत आणली जातात. संगणकाचे प्रोग्राम किंवा कोड प्रोग्रामिंग भाषेमध्ये असतात जे अल्गोरिदम पद्धतीने कार्यान्वित केली जातात. अल्गोरिदम कोणतेही समस्या सोडवण्याची एक उपयुक्त तंत्रशुद्ध पद्धत आहे. मोठ्या समस्याचे अनेक भागात विभाजन करुन समस्याचे समाधान शोधणे अल्गोरिदम मुळे सोपे जाते.
अल्गोरिदमची कार्यपद्धती फ्लोचार्ट द्वारे दर्शवली जाते. फ्लोचार्ट मध्ये प्रत्येक पायरीचे कार्य चिन्ह आणि संकेताद्वारे दर्शवलेले असतात. फ्लोचार्ट मध्ये समस्या सोडवण्यासाठी अनेक पायरीसदृश्य सुचनेची रचना केलेली असते. अल्गोरिदम अनेक प्रकारची आहेत तसेच संगणक सह अनेक क्षेत्रामध्ये अल्गोरिदमचा उपयोग केला जातो. उदा. संगणक विज्ञान, डेटा साईंस, आर्टीफिशीअल इंटेलिजन्स्, गणित…
संगणकाचे पुर्ण रुप काय आहे? – Computer Definition in Marathi
संगणकाचे कार्यपद्धतीनुसार व्याख्या केलेली आहे. मुळात संगणक कश्या पद्धतीने आणि कोणत्या प्रकाराचे कार्य करु शकतो ते व्याख्या द्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
- C – Commonly – सर्वसाधारणपणे
- O – Operated – वापरले जाणारे
- M – Machine – यांत्रिकी
- P – Particularly – उपकरण
- U – Used for – ज्याचा वापर
- T – Technical and – तंत्रज्ञान आणि
- E – Educational – शैक्षणिक
- R – Research – संशोधनसाठी केला जातो.
साधारणपणे शैक्षणिक आणि शंशोधन सारख्या कार्यसाठी वापरले जाणारे यांत्रिकी उपकरण अशी संगणकाची व्याख्या करु शकतो. परंतु संगणकाचा आशय व्याख्येपुरते मर्यादित नाही. एकंदरीत संगणक असा शब्द उच्चारला तर आपल्यासमोर येते संगणकाची हार्डवेअर, सॉफ्टवेअर, इंटरनेट आणि वेब.
प्रचलित विषय
संगणकाची कार्यपद्धती – Computer Work System in Marathi
संगणक कोणत्या पद्धतीने कार्य करतो? याला संगणकाची कार्यपद्धती असे म्हणतात. वापरकर्ता (User), इनपुट, प्रोसेस आणि आऊटपुट अशी एक परीपुर्ण यंत्रणा एका विशिष्ठि पद्धतीने कार्य करते. संगणक कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये माहिती यंत्रणा एक महत्वाचा भाग असतो. संगणक कार्यपद्धतीचेी सुरवात माहिती यंत्रणा (Information Technology) , आदान (Input), प्रक्रिया (Process) आणि प्रदान (Output) कार्य नुसार पुर्ण होते. यामधील एकाही घटकाची कमतरता पुर्ण संगणक कार्यपद्धतीला प्रभावित करत असते. संगणक कसे कार्य करते? किंवा संगणकाची कार्यपद्धती समजुन घेण्यासाठी प्रत्येक घटक कसे कार्य करतात ते समजुन घेणे आवश्यक आहे.
1. माहिती यंत्रणेची कार्यपद्धती आणि घटक
डेटा, माहिती-पुस्तीका, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि वापरकर्ता हे सर्व माहिती यंत्रणेचे घटक आहेत. या सर्व घटकांच्या समुहाने माहिती यंत्रणा पुर्ण होते. संगणकाचा पुर्ण क्षमतेने उपयोग करण्यासाठी माहिती यंत्रणेचे हे पाचही घटक महत्वपुर्ण असतात. माहिती यंत्रणा संगणक द्वारे माहितीची देवाण-घेवाण करणारी एक कार्यपद्धती आहे. माहितीचा वापर आणि व्यावस्थापन करणारी 5 घटक कश्या पद्धतीने कार्य करतात याची माहिती या भागा मध्ये समाविष्ठ केलेली असते.
- संगणक वापरकर्ता (User): संगणक वापरणारा व्याक्तीला वापरकर्ता असे म्हणतात. वापरकर्ता संगणक कार्यपद्धतीचा महत्वाचे घटक असतो. कारण संगणकाला कार्यकरण्याचे सुचना किंवा माहिती तो देत असतो.
- डेटा (Data): टेक्स्ट, अंक, सिम्बॉल, कमांड आणि सुचना यांच्या माहितीच्या स्वरुपाला याला डेटा असे म्हणतात. उदा. कीबोर्ड द्वारे टेक्स्ट टाईप करणे किंवा माऊसद्वारे कमांड आणि पर्यायांची निवड करणे.
- मॅन्युअल (Manual): संगणकाचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कसे वापरयाचे याची माहिती पुस्तक म्हणजेच मॅन्युअल होय. मॅन्युअल प्रिंन्टेड पुस्तकाच्या स्वरुपात किंवा इबुकच्या स्वरुपात उपलब्ध असतात.
- हार्डवेअर (Hardware): संगणकाचे प्रत्यक्षात दिसणारे आणि स्पर्श करु शकणारे उपकरण किंवा घटक म्हणजे हार्डवेअर होय. आदान, प्रक्रिया आणि प्रदान कार्य करण्यासाठी यांचा वापर होतो. उदा. माऊस, किबोर्ड, सि.पी.यु., मॉनिटर, प्रिंन्टर….
- सॉफ्टवेअर (Software): सॉफ्टवेअर अनेक सुचना आणि कमांडचा संच असतो ज्याला प्रोग्राम असे म्हणतात. संगणकाला वापरकत्याद्वारे देण्यात येणारी सुचना किंवा आज्ञा प्रत्यक्षात कार्यान्वीत करणारा प्रोग्रामचा संच म्हणजेच सॉफ्टवेअर होय. उदा. नोटपॅड, पेंन्ट, वर्डपॅड….
2. आदान कार्यपद्धती – Input System in Marathi?
संगणकाने कोणते आणि काय कार्य करावे? याची माहिती प्रविष्ठ (Input) करण्याची एक पद्धत असते. संगणकाला माहिती देण्याच्या या पद्धतीला आदान (Input) क्रिया म्हणतात. उदा. एखादे नाव टाईप करण्यासाठी आपण कीबोर्ड द्वारे अक्षरे टाईप करतो म्हणजेच अक्षराच्या स्वरुपात डेटा संगणकाला देतो तसेच माऊस द्वारे मेनू किंवा कमांड निवडतो या सर्व क्रिया संगणकाला माहिती किंवा सुचन (Data & Instruction) देत असतात त्यामुळे या क्रियेला आदान क्रिया (Input) असे म्हणतात.
संगणकाला माहिती देण्याचे कार्य करण्या-या विभागला इनपुट म्हणजेच आदान विभाग (Input Unit) असे म्हणतात. आदान विभागचे कार्य वापरकर्त्या द्वारा दिलेल्या माहिती संकलन करुन संगणकाला देणे असते. संगणकाला माहिती देण्याची प्रक्रिया इनपुट विभागाद्वारे पुर्ण केली जाते. इनपुट विभागाद्वारा अनेक प्रकारच्या हार्डवेअरचा उपयोग संगणकाला माहिती देण्यासाठी होतो. होतो.
आदान विभाग (Input Unit) आंतर्गत अनेक संगणक साधनांचा (Computer Devices) असा समुह असतो ज्याद्वारे संगणकाला डेटा, सुचना किंवा आज्ञा दिली जातो. संगणकाला माहिती देणा-या आदान साधनांना इनपुट हार्डवेअर असे म्हणतात. आदान साधनांद्वारे (Input Devices or Hardware) संगणकाला माहिती देण्याचे कार्य पुर्ण केले जाते. आदान क्रिया, आदान विभाग आणि आदान साधने या सर्वाचें मिळुन एक आदान यंत्रणा (Input System) पुर्ण होते. संगणकामध्ये वापरण्यात येणारी कोणतेही आदान साधने याच कार्य पद्धती द्वारे संगणकाला डेटा देत असतात.
3. प्रक्रिया कार्यपद्धती – Process System in Marathi?
आदान साधनांद्वारे संकलित केलेली माहिती संगणकाच्या प्रक्रिया विभागा पर्यंत पोहचवली जाते. डेटाचे विश्लेषन करने, डेटा नियंत्रित करणे, गणन आणि तर्क क्रिया पुर्ण करणे आणि माहितीचे अंतिम स्वरुप प्रदान करणे या सर्व क्रियेला प्रक्रिया (Process) असे म्हणतात. उदा. वापरकत्याने टाईप केलेली अक्षरे किंवा माऊसद्वारे निवडलेली माहिती कोणत्या स्वरुपातील आहे? ते ठरवतो त्यावरती प्रक्रिया करुन त्या डेटाचे अंतिम स्वरुप मॉनिटर किंवा प्रिंन्टरद्वारे प्रदान करतो.
नियंत्रण, गणिती, तर्क आणि स्मृती विभागाचा समावेश प्रक्रिया विभाग (Processing Unit) आतंर्गत होतो. नियंत्रण विभागाद्वारे माहिती काय आहे? कोणत्या स्वरुपात, कोणत्या साधनांद्वारे आलेली आहे आणि कोणत्या साधनां पर्यत पोहचवयाची आहे ते ठरवते जाते. गणिती विभाग आकडेमोड आणि गणना करण्याचे कार्य करतो, तर्क विभाग तर्कसंगत डेटावर प्रक्रिया करतो आणि परीणाम प्रदान करते. स्मृती (Memory Unit) विभाग माहिती आणि डेटा संग्रहन करण्याचे कार्य करते तसेच डेटा कोणत्या स्मृती स्थानामध्ये संग्रहीत करावयाचे आहे ते ठरवतो.
प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी संगणक प्रक्रिया साधनांचा (Processing Device) उपयोग करतो. प्रक्रिया विभाग अंतर्गत सि.पी.यु., मदरबोर्ड, मेमरी आणि संग्रहन साधनांचा समावेश होतो तसेच या सर्व साधनांना प्रक्रिया साधने असे म्हणतात. प्रक्रिया साधनांद्वारे डेटाचे निंयंत्रण, व्यावस्थापन आणि संग्रहन अश्या अनेक स्तरावर कार्य केले जाते ज्याचा उद्देश निष्कर्ष प्रदान करणे असते.
4. प्रदान कार्यपद्धती – Output System in Marathi?
संगणकाने प्रक्रिया केलेली माहिती देण्याच्या पद्धतीला प्रदान क्रिया (Output Work) म्हण्टले जाते. प्रदान क्रियेमध्ये मुख्यत: प्रक्रिया केलेल्या माहितीचे अंतिम स्वरुप असते. प्रदान कार्यपद्धती मधील सर्वात शेवटची क्रिया असते. उदा. टेक्स्ट स्वरुपातील प्रक्रिया केलेला डेटा मॉनिटर वर पाहणे हे प्रदान कार्यपद्धती द्वारे पुर्ण होते.
प्रक्रिया केलेली माहिती ज्या विभागाद्वरे दिली जाते त्याला प्रदान विभाग (Output Unit) असे म्हणतात. प्रदान विभाग माहिती देण्यासाठी प्रदान साधनांचा उपयोग करते. प्रदान विभागाचे मुख्य कार्य वापरकर्त्याच्या सुचने नुसार योग्य प्रदान विभागाला माहिती पाठवण्याचे कार्य करते.
संगणकाने प्रक्रिया केलेली माहितीचे अंतिम स्वरुप प्रदान साधनां (Output Device) द्वारा दिले जाते. प्रदान साधनांमध्ये मॉनीटर, प्रिंन्टर, स्पिकर… अश्या अनेक प्रदान साधनांचा उपयोग होतो. उदा. संगणक वापरकत्याने टेक्स्टच्या स्वरुपाती माहिती कि-बोर्ड सारख्या आदान साधनां द्वारे देतो, प्रक्रिया सि.पी.यु. सारखी प्रक्रिया साधने त्यावर प्रक्रिया करतात आणि प्रदान साधने ती माहिती मॉनीटर सारख्या प्रदान साधनांद्वारे प्रस्तुत करण्याचे कार्य करतात.
संगणकाचे घटक – Computer Parts in Marathi
संगणकाचे हार्डवेअर हे एक अश्या प्रकारचे भाग असतात ज्यांना आपण पाहु शकतो आणि स्पर्श करु शकतो. संगणकाचे लक्षपुर्वक पाहिले असता आपणास सिस्टीम युनिट, मॉनिटर, कि-बोर्ड, माऊस, प्रिंन्टर…. सारखी हार्डवेअर दिसतात. संगणकाचे सिस्टीम युनिट / कॅबिनेट मध्ये संगणकाचे असे अनेक हार्डवेर असतात जे सहसा आपणास दिसत नाहीत. परंतू कॅबिनेट जेव्हा उघडला जातो तेव्हा आत मध्ये हार्ड डिस्क, मदरबोर्ड, मेमरी डिव्हाईस सारखे अनेक हार्डवेअर म्हणजेच संगणकाचे भाग पाहु शकतो.
संगणक हार्डवेअरचा हा भाग सहज लक्षात यावा यासाठी यांची दोन भागात विभागणी करता येईल. संगणकामध्ये वापरली जाणारी सर्व हार्डवेअरचे प्रकार आणि कार्य यांची संक्षीप्त माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
1. संगणकाचे आंतर्गत घटक – Computer’s Internal Parts
संगणकाचे कॅबिनेट म्हणजेच सिस्टीम युनिटच्या आत ज्या हार्डवेअचा समावेश होतो त्याला संगणकाचे आंतर्गत हार्डवेअर (Internal Hardware) असे म्हणतात. विजप्रवाह आणि इतर सुरक्षा कारणाने काही हार्डवेअर संगणकाच्या कॅबिनेट मध्ये बसवलेली असतात.
- मायक्रोप्रोसेसर (Microprocessor)– संगणकाचे मुख्य प्रक्रिया करणारे भाग म्हणुन मायक्रोप्रोसेसर ओळखले जाते. याला सि.पी.यु. देखिल म्हणतात. तर्क, गणिती, अनेक प्रकारच्या जटिल प्रक्रिया करतो म्हणुन मायक्रोप्रोसेसरला संगणकाचा मेंदु असे म्हणतात. मायक्रोप्रोसेसर मदरबोर्डवरती सि.पी.यु. फॅनच्या खाली बसवलेले असते. मायक्रोप्रोसेसर डेटा प्रक्रिये मध्ये अधिक उष्णता निर्मान करतो त्यामुळे त्यावरती फॅन बसवलेला असतो जो मायक्रोप्रोसेसरला थंड करण्याचे कार्य करतो.
- मदरबोर्ड (Motherboard)– मदरबोर्ड एक अश्या प्रकारचे मध्यवर्ती भाग आहे ज्यावरती संगणकाचे सर्व हार्डवेअर जोडली जातात. यापैकि काही हार्डवेअर सरळ खाच्यात खेचुन बसवली जातात, तर काही हार्डवेअर मदरबोर्ड वरील पोर्ट द्वारे जोडली जातात. हार्डवेअर जोडणीसाठी वायर आणि वायरलेस पद्धतीचा वापर केला जातो. संगणकाचे हार्डवेअर जोडणीसाठी पॅरेलल, PS-2, यु.एस.बी. पोर्ट सारखी सरंचना मदरबोर्डवरती पहावयास मिळते. मदरेबोर्डवरती असलेले कंपोनन्ट एकमेकांना जोडण्यासाठी लहान लाईन असतात त्याला बस लाईन असे म्हणतात. डेटा एका ठिकाणाहुन दुस-या ठिकाणी वहन करण्यासाठी बस लाईन उपयोग होतो.
- रॅम (RAM) – संगणकाचे तात्पुरते संग्रहन माध्यम म्हणुन रॅम (RAM-Random Access Memory) मेमरीला ओळखले जाते. संगणकावरती चालू असलेले कार्य जे साठवले गेलेले नसते अश्या प्रकारचा डेटा रॅम मेमरीमध्ये संग्रहीत केला जातो. विजप्रवाह खंडित झाल्यावर अथवा संगणक बंद झाल्यावर रॅम मेमरीमधील डेटा पुसला जातो म्हणुन रॅम मेमरीला तात्पुरती मेमरी (Volatile Memory) म्हणतात. संगणकाची कार्यकारी यंत्रणा आणि ऍप्लीकेशनचा डेटा रॅम मेमरीमध्ये संग्रहीत होत असतो.
- रोम (ROM) – रॉम (ROM-Read Only Memory) मेमरी संगणकाचे कायमस्वरुपी संग्रह साधन आहे. विजप्रवाह खंडित झाल्यावर किंवा संगणक बंद केल्यावर यातील डेटा किंवा माहीती नष्ट होत नाही किंवा पुसली जात नाही. म्हणून याला नन-व्हॉलेटाईल मेमरी (Non-volatile Memory) किंवा कायमस्वरुपी मेमरी देखिल म्हणतात. संगणक चालु होण्यासाठीची प्राथमिक माहिती रोम मेमरीमध्ये संग्रहीत असते. जसे हार्डवेअरची माहिती, संगणकाचे तापमान, दिनांक आणि वेळ…
- हार्ड डिस्क (Hard Disk) – हार्ड डिस्क संगणकाचे सेकंडरी स्टोरेज साधन आहे जे संगणकाच्या कॅबिनेट मध्ये बसवलेली असते. संगणकामध्ये असलेली सर्व माहिती फाईलच्या स्वरुपात हार्ड डिस्क मध्ये साठवलेली असते. ऍप्लीकेशन मध्ये केलेले कार्य सुरक्षित करण्यासाठी फाईलच्या स्वरुपात डेटा संगणकमध्ये साठवला जातो.
- पॉवरसप्लाय (SMPS) – पॉवरसप्लायचे मुख्य कार्य संगणकाच्या वेगवेगळ्या हार्डवेअर सारख्या साधनांना विजप्रवाह / पॉवर देण असते. याला SMPS असे म्हणतात. SMPS द्वारे साधानांना आवश्यक तितकाचा विजप्रवाह दिला जातो. थोडक्यात विजप्रवाह वितरण आणि नियंत्रण करण्याचे कार्य SMPS द्वारे केले जाते.
2. संगणकाचे बाह्य घटक – Computer’s External Parts
कॅबिनेटच्या बाहेरुन जोडली जाणारी हार्डवेअर यांना संगणकाचे बाह्य घटक किंवा हार्डवेअर असे म्हणतात. जोडणीसाठी अनेक प्रकारची पोर्टची रचना कॅबिनेटवरती केलेली असते. माऊस, कि-बोर्ड, प्रिंन्टर… सारखी हार्डवेअर विविध पोर्ट द्वारे जोडली जातात.
- कॅबिनेट (Cabinet) – कॅबिनेट संगणकाचा एक प्रकारचा बॉक्स असतो जो संगणकाच्या आंतर्गत हार्डवेअर/भाग सुरक्षित ठेवण्यास मदत करत असतो. संगणक चालु, बंद आणि रिस्टार्ट करण्यासाठीचे बटनची रचना कॅबिनेटच्या समोरच्या भागावरती केलेली असते. तसेच यु.ए.बी. आणि साऊंड सारखी अतिरीक्त पोर्ट कॅबिनेंटच्या समोरच्या बाजुला दिलेली असतात. संगणकाच्या बाहेरील हार्डवेअर्स जोडणीसाठी अनेक पोर्टची रचना कॅबिनेटच्या मागच्या बाजुला केलेली असते.
- मॉनिटर (Monitor) – संगणकावर केले जाणारे सर्व कार्य थेट प्रेक्षपित करण्याचे कार्य मॉनिटर करत असतो. मॉनिटर संगणकाचा महत्वाचा आऊपुट हार्डवेअर आहे. मॉनिटर संगणक कॅबिनेटच्या मागील VGA किंवा HDMI पोर्टवरती जोडला जातो. कलर, कॉन्ट्रास्ट, ब्राईटनेस, रिझ्यॉलेशनच्या सेटिंग साठी मॉनिटरवर मॉनिटरच्या अतिरीक्त बटन दिलेली असतात. तसेच काही आतिरीक्ट मॉनिटर सेटिंगसाठी संगणक मधील सॉफ्टवेअर पर्यायाचा देखिल वापर करता येतो.
- कि-बोर्ड (Keyboard) – कि-बोर्ड ची रचना एक प्रकारे टाईपरायटर सारखी असते ज्यावरती अल्फाबेट आणि अंक यांचा समावेश असतो तसेच फंक्शन, स्पेशल, नेव्हिगेशन किज् सारख्या अतिरीक्त किज् ची रचना केलेली असते. टेक्स्ट, अंक, पॅराग्राफ लिहणे आणि संगणकाला आज्ञा देणे तसेच नियंत्रण करण्याचे कार्य किबोर्ड द्वारे केले जाते. स्पेशल आणि फंक्शन किजचा वापर प्रत्येक ऍप्लीकेशन नुसार वेगवेगळा असतो.
- माऊस (Mouse) – माऊस ला पॉईंटिंग डिव्हाईस म्हणतात. मॉनीटरच्या स्क्रिनवरती बाणाच्या स्वरुपात दिसणा-या घटकाला पॉईंटर किंवा कर्सर म्हणतात. माऊस मुख्य कार्य डस्कटॉप आणि ऍप्लीकेशनचे घटक, मेंनु आणि कमांड निवडण्याचे असते. माऊसवरती तिन बटन असतात. यामध्ये लेफ्ट, राईट आणि स्क्रॉल बटनांचा समावेश असतो. अनुक्रमे संगणकाच्या स्क्रिनवर दिसणारे घटक निवडणे, पर्याया व कमांडची निवड करणे आणि पेज खाली किंवा वर दिशेन स्क्रॉल करण्यासाठी माऊस बटनांचा उपयोग होतो.
- प्रिंन्टर (Printer) – डॉक्युमेंट, इमेज तसेच इतर घटकांची कागदावरती छपाई करण्याकरीता प्रिंन्टर साधनांचा उपयोग होतो. राखाडी आणि काळ्या रंगामध्ये मोनोक्रोम आणि अनेक रंगा मध्ये छपाई करण्यासाठी कलर प्रकारची प्रिंन्टर वापरली जातात. प्रिटिंग साठी वापरले जाणा-या तंत्रज्ञानानुसार लेजर, इंकजेट, डॉट मेट्रिक्स… प्रकारचे प्रिंन्टर निवडले जातात.
- स्कॅनर (Scanner) – स्कॅनर एक प्रकारचे चित्रण डिव्हाईस आहे. कोणत्याही कागदावरली माहिती डिजीटल स्वरुपात संगणकामध्ये घेण्या करीता याचा वापर होतो.
संगणक सॉफ्टवेअर – Computer Software
सुचना,कमांड किंवा मेनु द्वारे विशीष्ठ कार्य करणा-या प्रोग्रामचा संच म्हणजे सॉफ्टवेअर होय. सॉफ्टवेअर मध्ये प्रत्यके क्रियेला कार्यान्वित करण्यासाठी प्रोग्राम आवश्यक असतात. एक सॉफ्टवेअर अनेक प्रकारच्या क्रिया करण्यासाठी त्यासंबधीत मेनु आणि कमांडचा उपयोग करतात. मेनु किंवा कमांडच्या क्रिया प्रोग्रामद्वारे लिहलेल्या असतात त्यानुसार कोणत्या क्रिया करायच्या आहेत त्याच्या सुचना संगणकाला सॉफ्टवेअर आणि प्रोग्राम मार्फत दिली जाते.
सॉफ्टवेअरचे कार्य किंवा वैशिठ्ये दर्शवण्यासाठी त्यांचे दोन प्रमुख प्रकारात वर्गीकरण् केले जाते. सॉफ्टवेअर विषयीची विस्तृत माहिती सॉफ्टवेअर म्हणजे काय? या ब्लॉग मध्ये दिलेली आहे. या ठिकाणी संक्षिप्त मध्ये सॉफ्टवेअर आणि त्याचे प्रकार याची माहिती दिली आहे.
सॉफ्टवेअर म्हणजे काय? सॉफ्टवेअर विषयीची विस्तृत माहिती सॉफ्टवेअर म्हणजे काय? या ब्लॉग मध्ये दिलेली आहे.
- सिस्टीम सॉफ्टवेअर: संगणक हार्डवेअर यांचे व्यावस्थापन, नियंत्रण आणि सुरक्षा प्रदान करण्याचे कार्य सिस्टीम सॉफ्टवेअर मार्फेत केले जाते. संगणकाची कार्यकारी यंत्रणा संगणकाचे ॲप्लीकेशन त्यांचा वापर आणि नियंत्रण करण्यासचे कार्य करते. डिव्हाईस ड्राईव्हर संगणकाचे हार्डवेअर कार्य करण्यासाठी आवश्यक असतात. डिव्हाईस ड्राईव्हर एक प्रकारचे प्रोग्राम असतात ज्याद्वारे हार्डवेअरचे संचालन आणि नियंत्रण होते.
- ऍप्लीकेशन सॉफ्टवेअर: संगणकावरती कार्य करण्यासाठी अनेक प्रकारची ऍप्लीकेशन सॉफ्टवेअर उपलब्ध असतात. प्रत्येक ऍप्लीकेशन ठराविक कार्य करण्याची सुविधा प्रदान करते. उदा. फोटो एडिंटींगसाठी फोटोशॉप, डॉक्युमेंट तयार करण्यासाठी वर्ड, प्रेझेन्टेशन साठी पॉवरपॉईंट असे अनेक ऍप्लीकेशनचा वापर संगणकावरती करता येऊ शकतो. ऍप्लीकेशन कोणते कार्य करतो त्यानुसार त्यांचे प्रकारात वर्गीकरण केले जाते. प्रत्येक ऍप्लीकेशनेच कार्य ठराविक आणि मार्यादित असतात.
संगणकाचे प्रकार?
संगणक वापरताना संगणकाचा प्रकार आणि आकार महत्वाचा ठरतो. संगणक किती जागा व्यापतो? आणि कोणत्या प्रकारचे कार्य आहे त्याअनूशंगाने त्याची निवड ठरवली जाते. जसे एकाद्या कंपनी मध्ये कार्याचे संचालन व माहिती हाताळण्यासाठी सुपर संगणक वापरले जाते. घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये टेबलावर मावतील या आकाराचे डेस्क्टॉप संगणक वापरली जातात, प्रवास करताना संगणकाचा वापर करता यावा या हेतुने लॅपटॉप सारखे आकारने लहान मायक्रो संगणकाची निर्मीती करण्यात आली. संगणकाचे किती प्रकार आहेत? या प्रश्नांचे उत्तर संक्षिप्त स्वरुपात पुढील प्रमाणे दिलेली आहे.
- सुपर कॉम्प्युटर (Super Computer) – अतिउच्च प्रोसेसिंग गती आणि स्टोरेज क्षमता सुपर कॉम्प्युटर वैशिष्ठ्ये आहे. इतर संगणकाच्या तुलनेमध्ये सुपर कॉम्प्युटर वेगवान आणि महागडे असतात. सुपर कॉम्प्युटर मध्ये डेटा प्रोसेसींग साठी मल्टीप्रोसेसर तंत्रज्ञानचा वापर केलेला असतो. मल्टीप्रोसेसिंग तंत्रज्ञानाद्वारे अनेक प्रक्रिया एकाच वेळी केल्या जातात. शासकीय, व्यावसायीक, वैज्ञानिक, आंतरराष्ट्रीय, सुरक्षा अश्या अनेक संस्थाद्वारे याचा वापर केला जातो. PARAM हे भारताचे सुपर कॉम्प्युटर आहे.
- मेनफ्रेम कॉम्प्युटर (Mainframe Computer) – स्टोरेज क्षमता आणि अनेक वापरकर्ता (MultiUser) हे मेनफ्रेम कॉम्प्युटर वैशिठ्ये आहे. डेटाबेस सारख्या मोठ्या प्रमाणात (Larg Amount) डेटा प्रकिया आणि स्टोरेज करण्यासाठी याचा वापर होतो. WAN नेटवर्कीगचा वापर करुन एकाच वेळी अनेक वापरकर्ते याचा वापर करु शकतात आणि माहिती विभागुन वापरु शकतात.
- मिनी कॉम्प्युटर (Mini Computer) – मेनफ्रेम पेक्षा कमी गतीचा परंतु एका पेक्षा आधिक वापरकर्तांना वापरता येणारे संगणक म्हणुन मिनी कॉम्प्युटरचा वापर केला जातो. अधिक संग्रहन क्षमता तसेच गतिने डेटा प्रोसेस करण्यासाठी सक्षम असातात. मोठ्या व्यावयायीक संस्था किंवा शक्षणिक संस्था या प्रकारच्या संगणकाचा सर्व्हर्स संगणक म्हणुन उपयोग करतात जे LAN द्वारे संगणक माहिती विभागुन वारण्याची सुविधा प्रदान करतात.
- मायक्रो कॉम्प्युटर (Micro Computer) – आकाराने लाहान आणि वयक्तिक कार्यासाठी उपयोगात येणारे संगणक म्हणुन मायक्रो कॉम्प्युटर उपयोग केला जातो. मायक्रोकॉम्प्युटरचा वापर वयक्तिक कारणासाठी केला जातो म्हणुन याला वयक्तिक संगणक (PC-Personal Computer) देखिल म्हणतात. मायक्रो कॉम्प्युटर मध्ये डेटा प्रकियेसाठी मायक्रोप्रोसेसरचा वापर केलेला असतो. ज्यामुळे आकाराने लहान संगणक तयार करण्यात यश आले.
- डेस्कटॉप (Desktop) – डेस्कटॉप सारखे संगणक एखाद्या टेबलावरती मावतील या आकाराचे असतात. तसेच डेस्कटॉप संगणक मायक्रोकॉम्प्युटरच्या श्रेणीमध्ये येतात. डेस्कटॉप प्रकारच्या संगणक वापर एका वेळी एकच व्याक्ती करु शकतो म्हणुन याला पर्सनल कॉम्प्युटर सुद्धा म्हणतात. एकावेळी मल्टी टास्कींग सुविधेचा वापर करुन वापरकर्ता एकाच वेळी अनेक कार्य करु शेकतो. जसे डॉक्युमेंट तयार करताना संगित ऐकु शकतो किंवा पेंट ॲप्लकेशन मध्ये ड्रॉईंग तयार करुन शकतो.
- लॅपटॉप (Laptop) – डेस्कटॉप पेक्षा लहान आणि पोर्टेबल संगणक म्हणुन लॅपटॉप प्रचलित आहेत. ऑफिस आणि प्रवासामध्ये या प्रकारचे संगणक वापरणे सोयीचे जाते. लॅपटॉपची गती आणि कार्यक्षमा डेस्कटॉप संगणकाइतकीच असते. लॅपटॉप संगणक सद्धा मायक्रो कॉम्प्युटरच्या श्रेणीमध्ये येतात. लॅपटॉप कॉम्प्युटर फोल्ड करण्याची सुविधा असत.
- नोटबुक (Notepad) – नोटबुक संगणक लॅपटॉप संगणक सारखेच असतात परंतु आकाराने एखाद्या पुस्तका एवढे लहान असतात. प्रवासामध्ये संगणक वापरणे. नोटबुक संगणकाचा वापर एकावेळी एकच व्याक्ती करु शकतो. नोटबुक संगणक आकाराने लहान असल्याकारणाने ते नाजूक असतात तसेच बिघाड झाल्यास ते दुरुस्त करणे खर्चिक आणि वेळखाऊ असते.
संगणकाचे गुणधर्म आणि वैशिटये
- अचुकता – अचुकता संगणकाचे सर्वात महत्वाच्या वैशिष्ट्या पैकि एक आहे. संगणक दिलेल्या माहितीवर प्रकिया करुन त्याचे अचुक निष्कर्ष प्रदान करतो. गणिती प्रक्रिया, तर्क अश्या अनेक कार्य संगणकमध्ये असलेल्या सुचनानुसार पुर्ण करत आसतो. त्यामुळे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अचुकपणे देणे शक्य होते.
- संग्रहण क्षमता – संगणकाची संग्रहन क्षमता उच्चतम असते. संगणकामध्ये खुप मोठ्या प्रमाणात डेटा साठवण्याची सुविधा असते तसेच आवश्यकतेनुसार त्यामेध्ये वाढ देखिल करता येते. संगणकाची तात्पुरती आणि कायमची सुरक्षित राहणारी संग्रहन क्षमता त्या संगणकामध्ये उपलब्ध असलेल्या संग्रहन क्षमतेवरती अवलंबुन असते.
- गती – संगणकाची कार्य करण्याची गती मानवाच्या तुलनेत अनेक पटीने जास्त असते. उदा. एखादद्या गणिती प्रक्रिया तो काही सेंकदामध्ये सोडवतो परंतू मानवला ते करण्यासाठी काही वेळ लागू शकतो.
- विचारशुन्यता – संगणक एक निर्जीव उपकरण असल्याकारणाने त्यामध्ये विचार करण्याचा अभाव असतो. मानव ज्या प्रमाणे एखाद्या गोष्ठीवर विचार करुन निर्णय घेतो किंवा बदलतो त्या प्रमाणे संगणक करु शकत नाही. संगणकाला उपलब्ध करुन दिलेल्या माहिती नुसार मार्यादित निष्कर्ष किंवा परीणाम देतो.
- सातत्य – सातत्य म्हणजे सलग न थकता थांबता कार्य करणे होय. संगणक विजेवर चलणारी उपकरण असतात जो पर्यंत विजप्रवाह चालु आहे तोपर्यंत संगणक सतत न थकता कार्य करु शकतो. त्यांमुळे संगणकालाचे अनेक वैशिष्ट्या पैकि हे महत्वाचे वैशिट्ये आहे.
- संगणकाचा आकार – डेस्कटॉप सारखे संगणक एका टेबलावरती मावतील या आकाराचे असतात. डेस्कटॉप संगणकाचा वापर वयक्तिक कार्यासाठी केला जातो म्हणुन याला वयक्तिक संगणक देखिल म्हणतात. तसेच लॅपटॉप सारखे वयक्तिक संगणक हव्या त्या ठिकाणी घेता येऊन जाणारे पोर्टेबल संगणक असतात.
- मल्टीटास्किंग – एकावेळा अनेक प्रोग्राम वापरण्याच्या वैशिष्ठ्याला मल्टीटास्किंग असे म्हणतात. डॉक्युमेंट तयार करणे, संगित एकणे, इंटरनेटचा वापर करणे अशी अनेक टास्क म्हणजेच कार्य एकावेळी करता येतात या वैशिष्ठ्यला मल्टीटास्किंग म्हणतात.
संगणकाचा वयक्तीक वापर – Personal use of Computer
- ईमेल – इमेल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मेल होय. म्हणजेच संगणकाद्वारे केले जाणारे प्रत्रव्यावहार होय. इंटरनेटद्वारे जगामध्ये कोणत्याही संगणकावर व्याक्तिला काही सेकंदामध्ये पत्र पाठवता येतो.
- शिक्षण – संगणकावर इंटरनेट द्वारे ऑनलाईन शिक्षण घेण्याची सेवा वापरता येते. संगणकीय पुस्तके म्हणजेच ईबुक सारख्या पुस्तकाद्वारे माहिती अध्ययन करता येते.
- इंटरनेट/वेब – संगणकाचा वापर करुन इंटरनेट सेवे द्वारा वेब जगामध्ये प्रवेश करता येते. वेबवरती असलेल्या अनेक संकेतस्थळ आणि त्यावरील माहितीचा वापर करता येते.
- गेमिंग – मनोरंजनासाठी आवडीचे गेम खेळता येतात. ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे अनेक प्रकारचे गेम खेळण्यासाठी संगणकाचा उपयोग करता येतो.
- डिझायनिंग – ग्राफिक, वेबपेज, डिझायनिंग अश्या अनेक प्रकारच्या कार्य संगणकाद्वारे पुर्ण करता येतात. परंतु याप्रकारची ऍप्लकेशन वापरण्यासाठी ते वापरण्याचे कौशल्य असणे गरजेचे आहे.
- शोध – इंटरनेटद्वारे वेबवरील कोणतेही माहिती सहजरित्या शोधता येते. माहिती, डॉक्युमेंट, इमेज, व्हीडिओ, ऑडिओ अश्या कितीतरी प्रकारच्या माहितीचा शोध संगणकाद्वारे घेता येतो.
FAQ’s – What is Computer?
कॉम्प्युटरला मराठी मध्ये काय म्हणतात?
कंम्प्युट या इंग्रजी शब्दापासुन कॉम्प्युटर हा शब्द तयार झाला आहे. कंम्प्युट म्हणजे गणन करणे आणि गणन क्रिया करणारे उपकरण म्हणजेच कॉम्प्युटर होय. कॉम्प्युटरला मराठीमध्ये संगणक (सं+गणक) असे म्हणतात.
संगणकाचे प्रमुख कार्य काय आहे?
वापरकर्त्या द्वारा माहिती स्विकारणे, त्यावर प्रक्रिया करणे, आणि प्रक्रिया केलेली अंतिम माहिती प्रदान करणे संगणकचे प्रमुख कार्य आहे. वरील सर्व क्रिया करण्यासाठी आदान, प्रक्रिया, प्रदान पद्धतीनुसार संगणक साधनांचा उपयोग करतो असतो.
संगणकाचे प्रकिया साधने कोणती आहेत?
सि.पी.यु. संगणकाचे महत्वाचे प्रकिया साधने आहे. संगणकाला दिलेली माहितीचे अंतिम स्वरुप प्राप्त करण्यापुर्वी त्या माहितीवर प्रक्रिया केली जाते त्यासाठी सि.पी.यु. साधनां सह मदरबोर्ड, प्रायमरी व सेकंडरी मेमरीचा देखिल सहभाग असतो.
संगणकाचे नियंत्रण विभाग कोणते कार्य करतात?
संगणकाला दिली जाणारी आणि संगणकाद्वारे प्राप्त केली जाणारी माहिती किंवा डेटा नियंत्रण करण्याचे कार्य करतो. संगणकाला डेटा कोणत्या माध्यमाने प्राप्त झाले आहे आणि कोणत्या साधनांना द्यायचे आहे ते नियंत्रण आणि व्यावस्थापनाचे कार्य नियंत्रण विभागा द्वारे पुर्ण केले जाते.
संगणकाचा शोध कोणी लावला?
संगणकाचा शोध चार्लस बॅबेज यांनी लावला.