1999 मध्ये peterme.com या संकेत स्थळावर "ब्लॉग" या शब्दाचा सर्वप्रथम वापर केला होता. आणि तेव्हापासुनच ब्लॉग हे शब्द वेब वरील लेख या संदर्भात प्रचलित झाले.
एखाद्या विषयावर केलेले लेखन किंवा लिहलेली माहिती (Article) म्हणजेच ब्लॉग होय. ब्लॉग म्हणजे ख-या अर्थाने इंटरनेट किंवा वेब वर प्रकाशित केली जाणारी माहीतीचे पाने असतात.
ब्लॉग लिहणारा लेखक (Writer) म्हणजे ब्लॉगर होय. लेखक हा ब्लॉगचा महत्चाचा भाग आहे कारण एक लेखकच असतो जो एखाद्या ब्लॉगच्या विषयाची सविस्तर माहीत लिहत असतो.
वेगवेगळ्या विषयावर ब्लॉग च्या माध्यमाने सतत लिहत राहणे आणि ते प्रकाशित करणे यालाच ब्लॉगिंग असे म्हणतात.
एखाद्या निश किंवा तुमची रुची आणि कौशल्य असलेल्या विषयानुसार ब्लॉगचा विषय निवडता येतो. शैक्षणिक, पाककला, प्रवास, गेमिंग, कला व डिजाईन … असे अनेक विषयावर तुम्ही ब्लॉग लिहू शकता.
तुम्हाला ब्लॉग लेखनाची आवड आहे? ब्लॉगर.कॉम, वर्डप्रेस, विक्स.कॉम तुमच्यासाठी नि:शुल्क ब्लॉगिंगची सेवा देणा-या संकेतस्थळ नक्कीच उपयोगी येतिल.