इनपुट डिव्हाईस | संपुर्ण माहिती

संगणक वापरकर्त्याकडून (User) संगणकाला जो डेटा (Data) किंवा सुचना (Instruction) दिली जाते त्याला इनपूट (Input) असे म्हणतात. इनपुट एक प्रकारची क्रिया असते ज्याद्वारे संगणकाने कोणते कार्य करावे? या सुचना दिलेल्या असतात.

माऊसद्वारे ऑब्जेक्ट निवडणे, किबोर्ड द्वारे अक्षरे टाईप करणे, मायक्रोफोनद्वारे आवाज रेकॉर्ड करणे … इ. कार्ये इनपूट म्हणजेच अदान क्रिया म्हणून गणली जातात. थोडक्यात संगणकाला माहिती देण्याच्या किंवा प्रविष्ठ करण्याच्या पद्धतीला आदान किंवा इनपुट असे म्हणतात.

संगणकाला डेटा देणे, दिलेल्या डेटा वर प्रक्रिया करणे व प्रक्रिया केलेली माहिती मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या साधनांचा (Device) म्हणजेच डिव्हाईसेसचा (Hardware) वापर होतो किंवा केला जातो. इनपुट, प्रोसेस आणि आऊटपुट या कार्यपद्धतीने किंवा अनुक्रमाने संपुर्ण संगणक यंत्रणा वापरली जाते. संगणक कोणते कार्य करतो त्यानुसार कार्याचे विभाग आणि डिव्हाईसचे वर्गीकरण केले जाते. या ब्लॉग आंतर्गत इनपुट विभाग आणि साधनांची माहिती अभ्यासणार आहोत.

Computer Input Devices in Marathi Mahiti

इनपूट म्हणजे काय ? | Input Meaning in Marathi?

संगणकाला माहिती देण्याच्या किंवा प्रविष्ठ करण्याच्या पद्धतीला आदान किंवा इनपुट असे म्हणतात. वापरकर्त्याकडून संगणकाला डेटा (Data) किंवा सुचना (Instruction) देण्यासाठी इनपुट क्रियेचा आवलंब केला जातो. इनपुट एक प्रकारची क्रिया असते ज्याद्वारे संगणकाने कोणते कार्य करावे? या सुचना दिलेल्या असतात.

माऊसद्वारे ऑब्जेक्ट निवडणे, किबोर्ड द्वारे अक्षरे टाईप करणे, मायक्रोफोनद्वारे आवाज रेकॉर्ड करणे … इ. कार्ये इनपूट म्हणजेच अदान क्रिया म्हणून गणली जातात. थोडक्यात वापरकर्त्याकडून (User) संगणकाला जो डेटा (Data) किंवा सुचना (Instruction) दिली जाते त्याला इनपूट (Input) क्रिया म्हणतात.

इनपुट विभाग काय असतो? | What is Input Unit?

इनपुट विभाग संगणकाचा एका असा विभाग असतो त्याद्वारे संगणकाला देण्यात येणारी माहितीचे संकलन, व्यावस्थापन आणि नियंत्रण केले जाते. संगणकाला डेटा किंवा माहिती देण्यासाठी अनेक प्रकारच्या इनपुट साधनांचा उपयोग केला जातो. संगणकाला माहिती देणा-या सर्व उपकरणांचा समावेश इनपुट विभाग आंतर्गत होतो.

इनपुट डिव्हाईस काय असतात? | Input Devices in Marathi

संगणकाला माहिती किंवा सुचना देण्यासाठी अनेक उपकरणाचा उपयोग होतो या उपकरणांना हार्डवेअर किंवा डिव्हाईस असे म्हणतात. खासकरुन संगणकाला माहिती देणा-या उपकरणांना आदान साधने म्हणजेच इनपुट डिव्हाईस असे म्हणतात.

Input Devices of Computer

संगणक इनपुट डिव्हाईसेस द्वारा डेटा आणि सुचना प्राप्त करत असतो. संपुर्ण संगणक यंत्रणा वापरण्यासाठी संगणकाला सुचना किंवा कमांड देणे आवश्यक असते जे इनपुट डिव्हाईस द्वारे दिली जाते.

माऊस, किबोर्ड, स्कॅनर, साऊंड… असे अनेक इनपुट डिव्हाईस संगणकाला जोडलेली असतात. प्रत्येक इनपुट डिव्हाईसचे कार्य वेगवेगळे आणि विशीष्ट असतात. इनपुट डिव्हाईस संगणक सिस्टीम युनिटच्या मागील बाजूला असलेल्या पोर्ट वरती वायर अथवा वायरलेस पद्धतीने जोडली जातात.

इनपुट डिव्हाईसचे कार्य | Works of Input Devices

इनपूट साधणे (Input Devices) म्हणजेच इनपुट डिव्हाईस किंवा हार्डवेअर होय. संगणक वापरकर्ता वेगवगळ्या स्वरूपातील डेटा इनपूट साधनांचा वापर करुन संगणकाला देत असतो. वापरकर्ताद्वारे देण्यात आलेल्या डेटाचे विश्लेषन करून त्या डेटावर प्रक्रिया केली जाते.

इनपुट डिव्हाईसचे मुख्य कार्य वापरकर्त्याकडून (User) दिलेला डेटा स्वीकारणे व तो डेटा संगणकाच्या सि.पि.यु. म्हणजेच सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट (Central Processing Unit) या भागापर्यंत पोहचवणे जेणेकरून त्या डेटावर सि.पि.यु. प्रक्रिया करू शकेल आणि योग्य परीणाम प्राप्त होतील.

अ.क्र.इनपुट डिव्हाईसडिव्हाईसचे प्रकारडिव्हाईसचे कार्य
1माऊसपॉईंटिंग डिव्हाईससंगणकाला क्लिकच्या स्वरुपात डेटा किंवा सुचना देणारे डिव्हाईस किंवा हार्डवेअर
2कि-बोर्डटेक्स्टच्युअल डिव्हाईसअक्षर, अंक, चिन्ह आणि इतर खास प्रकारच्या सुचना आणि कमांड देण्यासाठी वापरले जाणारे महत्वाचे इनपुट साधन.
3टच पॅडटच पॅड सरफेस/पॉईंटिंग डिव्हाईसडेस्कटॉप संगणकामध्ये माऊस जसे कार्य करतो त्याचप्रकारे लॅपटॉप संगणका मध्ये टच पॅड पॉईंटिंग डिव्हाईस सारखे कार्य करतो.
4स्कॅनरइमेजिंग डिव्हाईसकागदावरील माहिती डिजीटल स्वरुपात रुपांतरीत करणारे उपकरण
5वेब कॅमऑडिओ – व्हिडीओ डिव्हाईसऑनलाईन ऑडिओ-व्हीडीओ संभाषणासाठी वापरले जाणारे इमेजिंग डिव्हाईस
6टच स्क्रिनटच स्क्रिन सरफेसमॉनिटरच्या स्क्रिनवरती दिसणा-या घटकांना स्पर्शाने सुचना आणि कमांड देण्याची सुविधा प्रदान करणारे घटक उदा. मोबाईल किंवा टच स्क्रिन लॅपटॉप
7मायक्रोफोनऑडिओ इनपुट डिव्हाईसआवाज म्हणजेच ध्वनी संगणकामध्ये डिजीटल स्वरुपामध्ये प्रविष्ट करणारे डिव्हाईस
8बारकोड स्कॅनरबारकोड स्कॅनर डिव्हाईससांकेतिक उभ्या रेषाच्या स्वरुपात असलेली सांकेतिक आणि डिजीटल माहिती वाचणारे डिव्हाईस
9जॉयस्टिकगेमिंग इनपुट डिव्हाईससंगणक आधारीत गेम जलद गतिने आणि कुशलतेन खेळता यावीत यासाठी जॉयस्टिक इनपुट डिव्हाईसचा वापर करतात.
10ओ.सि.आर.टेक्स्ट स्कॅनर इनपुट डिव्हाईसऑप्टीकल तंत्रज्ञानाचा वापर करुन कागदावरील प्रिंन्टेड टेक्स्ट स्कॅन करुन डॉक्युमेंट टेक्स्ट मध्ये रुपांतरीत करण्याचे कार्य करतो.
List of Input Devices in Marathi
Computer hardware in marathi mahiti

संगणक हार्डवेअर विषयी संपुर्ण माहिती

हार्डवेअर म्हणजे काय? प्रकार आणि कार्य

इनपुट डिव्हाईसचे प्रकार? | Types of Input Device in Marathi

संगणकाला डेटा देण्यासाठी मुख्यकरून इनपूट डिव्हाईस सारख्या कॉम्प्यूटर हार्डवेअरची (Hardware) आवश्यक असते. इनपूट साधने (Input Device) वापरकर्त्याकडून दिलेल्या माहितीचे संकलन करते व ते संगणकाला पुरवत असते. इनपूट डिव्हाईसचा वापर करून दिलेल्या डेटावर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया साधनांचा (Processing Device) वापर होतो तर प्रक्रिया झालेल्या माहीती पाहण्यासाठी आऊटपुट डिव्हाईसचा वापरचा वापर केला जातो.

1. माऊस इनपुट साधने

Mouse Device

संगणकाला जाडलेला महत्वाचा सुचना देणारे डिव्हाईस म्हणजे माऊस (Mouse Input Device) होय. माऊस आकाराने लहान असतो आणि यावरजी दोन किंवा तिन बटनांचा समावेश असतो. माऊस द्वारे मॉनिटर वरती असलेले घटक निवडणे, पर्याय आणि कमांडच्या स्वरुपात संगणकाला आज्ञा किंवा सुचना देण्याचे कार्य करता असतो.

2. कि-बोर्ड इनपुट साधने

Keyboard Input

किज् म्हणजेच कळ किंवा स्विच यांची संरचना असलेल्या फलकाला किबोर्ड (Keyboard Input Device) म्हणतात. किबोर्डचे दिसायला एखाद्या टाईपरायरटर असते. किबोर्ड संगणकाला अक्षर, अंक, चिन्हाच्या स्वरुपात महिती प्रविष्ट करणारे महत्वाचे इनपुट डिव्हाईस आहे. संगणकाला विशेष कमांड देण्यासाठी दोन किंवा दोन पेक्षा आधिक किज् संयुक्तपणे वापरली जातात.

3. टच पॅड

Touch Pad Input

लॅपटॉट सारख्या मायक्रो संगणकामध्ये माऊसचा पर्याय म्हणुन टचपॅड (Touch Pad Input Device) चा वापर होतो. टच पॅड माऊस सारखेच पॉईंटिंग डिव्हाईस आहे. टच पॅड एक प्रकारचा सपाट पृष्ठभाग असतो जो स्पर्श संवेदनशिल असतो ज्याद्वारे डेस्कटॉप वरील पॉईंटर नियंत्रित केले जाते. टच पॅडच्या आंतर्गत माऊस सारखी दोन बटन दिलेली असतात जे माऊस प्रमाणे कार्य करतात.

4. स्कॅनर इनपुट साधने

Scanner input

फोटोग्राफ, पोस्टर, पैम्पलेट, पुस्तके इ. कागदावरील छापील माहिती स्कॅनर (Scanner Input Device) द्वारे डिजीटल स्वरुपात संगणकामध्ये घेता येते जेणेकरुन त्यामध्ये एडिटीग आणि सुधारणा शक्य होते. स्कॅनरद्वारे कागदावरील माहिती पुर्णपणे डिजीटल इमेज आणि पिक्सेलच्या स्वरुपात स्कॅन करुन इमेज फाईलमध्ये साठवली जाते. स्कॅनरद्वारे स्कॅन केलेला डेटा संगणकाला दिला जातो अथवा साठवला जातो म्हणुन स्कॅनरला इनपुट डिव्हाईस असे म्हणतात. वापरकर्त्याच्या उपयोग नुसार स्कॅनरचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत.

5. वेबकॅम

Webcam Input

चित्र आणि चलचित्र स्वरुपातील माहिती इंटरनेट वर प्रसारीत करण्यासाठी वेब कॅमेरा अर्थात वेबकॅमचा (Webcam Input Device) उपयोग केला जातो. वेबकॅम एक प्रकारचे डिजीटल व्हिडीओ कॅमरा असतो जो डेस्कटॉप अथवा लॅपटॉप संगणकाला जोडलेला असतो. इंटरनेट द्वारा थेट प्रसारणासाठी (Live Streaming) मुख्य:त वेबकॅम वापरला जातो. वेब चॅटिंग, व्हिडीओ कॉलिंग, डिजीटल इमेज, ऑनलाईन संभाषण, मिटींगस्, ई-क्लासेस, इ. वेब आधारीत संभाषणासाठी वापरले जाणारे महत्वाचे इनुपट डिव्हाईस आहे.

6. टच स्क्रिन

Touch screen input

टचस्क्रिन (Touch Screen Input Device) एक प्रकारचे टच पॅनल असते जसे मोबाईल, टॅब्लेट आणि काही लॅपटॉप प्रकारच्या संगणकामध्ये वापरले जाते. स्क्रिन मध्ये समाविष्ट असलेल्या टच पॅनल द्वारे संपुर्ण सिस्टीम वापरण्या संबधीचे पर्याय उपलब्ध असातात आणि पर्याय निवडण्यासाठी हातची बोटे अथवा टचपेन चा वापर यामध्ये केलेला असतो. पर्याय निवडणे एक प्रकारचे आज्ञा किंवा सुचना सिस्टीमला दिली जाते म्हणून टच स्क्रिन एक प्रकारचे इनपुट श्रेणीमध्ये गणले जाते.

7. मायक्रोफोन

microphone input

आवाज किंवा ध्वनीं तरंगाचे (Sound Waves) इलेक्ट्रॉनिक सिग्नल (Electronic Signals) निर्मान करुन डिजीटल स्वरुपामध्ये परीवर्तन करणारे मायक्रोफोन (Microphone Input Device) किंवा माईक ऑडिओ इनपुट डिव्हाईस आहे. आवाज, गाणे रेकॉर्ड करणे, व्हाईस संभाषन, इ. ध्वनी स्वरुपातील डेटा संगणकाला देण्यासाठी मायक्रोफोनचा उपयोग केला जातो. मायक्रोफोन द्वारे संगणकाला ध्वनी पद्धतीने (Voice Command) कमांड देता येऊ शकते तयेच टेक्स्ट टाईपिंगसाठी देखिल याचा उपयोग होत आहे.

8. बार कोड रिडर इनपुट साधने

Barcode input

बारकोड स्कॅनर (Barcode Scanner Input Device) किंवा बारकोड रिडर एक इलेक्ट्रॉनिक इनपुट डिव्हाईस आहे. बारकोड स्कॅनर ऑप्टीकल तंत्रज्ञानासह इन्फ्रारेड लाईटचा वापर करुन उभ्या रेषांच्या सांकेतिक भाषेला वाचण्याचे कार्य करतो. बारकोड स्कॅनरचा उपयोग मॉल आणि वस्तुंची विक्री करणा-या संस्थामध्ये केला जातो ज्या द्वारे वस्तुंची किंमत, उत्पादनाचा दिनांक, वस्तुंचा साठा, खाते वही इ. संबधीत माहिती संगणकाद्वारे डिजीटली साठवली व व्यावस्थापित केली जाते.

9. जॉयस्टिक

Joystick Input

जॉयस्टिक (Joystick Input Device) हाताने वापरता येणारे आणि आकाराने एखाद्या छडी (Stick) असणारे इनपुट डिव्हाईस आहे. जॉयस्टिक मुख्यत: दिशा व वेगवेगळ्या कोन (Angle) मध्ये असलेल्या हालचाली टिपण्याचे आणि नियंत्रणाचे करण्याचे कार्य करते. जॉयस्टिक कोणत्याही दिशामध्ये सहज हलवता येते आणि संगणक या सर्व हालचाली इनपुट स्वरुपात प्राप्त करत असतो. जॉयस्टिकचा वापर सर्वाधिक व्हिडीओ गेम खेळण्यासाठी केला जातो.

10. ओ.सि.आर.

OCR Input

ऑप्टीकल कॅरेक्टर रिकग्नेशन याचे लघुरुप म्हणजेच ओ.सि.आर. (OCR Input Device) असे होते. ओ.सि.आर. डिव्हाईस हातामध्ये मावतील या प्रकारचे असतात. प्रिंन्टेड डॉक्युमेंट किंवा इमेज मधील अक्षरे, अंक आणि चिन्हांची माहिती वाचून त्याचे रुपांतर टेक्स्ट मध्ये करतो. थोडक्यात प्रिन्टेड कागदावरली माहिती डिजीटल स्वरुपात टेक्स्ट मध्ये परीवर्तीत करतो जणेकरुन त्यामध्ये बदल आणि सुधारणा करणे शक्य होतो आणि किबोर्ड द्वारे टाईपिंगसाठी लागणार वेळ वाचतो.

आपण काय शिकताल?

संगणक वापरण्यासाठी संगणकाने कोणते कार्य करावे? यासाठी सुचना आणि कमांड देणे आवश्यक आहे यालाच इनपुट म्हण्जेच आदान क्रिया म्हणतात. इनपुट डिव्हाईस द्वारे संगणकाला सुचना किंवा डेटा दिला जातो आणि इनपुट विभागाद्वारे या डेटाचे नियंत्रण आणि व्यावस्थापन केल जाते.

संगणक द्वारे विशिष्ट कार्य करुन घेण्यासाठी वापरकर्ता संगणकाला डेटा किंवा सुचना देत असतो. वापरकर्ताद्वारे दिल्या गेलेल्या सुचनांनुसार संगणक त्या डेटावर प्रक्रिया करून आऊटपुट किंवा माहिती (Information) देण्याचे कार्य करत असतो.

इनपुट देण्यासाठी माऊस, किबोर्ड, स्कॅनर, जॉयस्टिक… अश्या अनेक डिव्हाईसचा वापर करतो याची माहिती उपरोक्त विषयानुसार दिलेली आहे. याब्लॉग विषयी तुमचे मत, विचार आणि प्रतिक्रीया कंमेट बॉक्स मध्ये अवश्य कळवा. धन्यवाद!

शेअर करा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *