माहिती तंत्रज्ञानाचे (Information Technology) क्षेत्र आज झपाट्याने वाढत आहे. आणि त्यामुळे जग अगदी जवळ आले आहे. माहिती तंत्रज्ञानामध्ये संगणक या साधनाचे महत्त्व, वापर व झालेल्या विस्तारामुळेया क्षेत्रात क्रांती झालेली आहे. आज सर्वच क्षेत्रामध्ये संगणकचा वापर वाढत आहे. आणि इंटरनेटसारख्या तंत्रज्ञानाने जग एक (Global Village) वैश्विक खेडं बनलं आहे.
संगणकाचा इतिहास – Computer History Marathi
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाटयाने होणाऱ्या विस्तार व वापरामुळे या क्षेत्रात अग्रमूल बदल होत आहे. इंटरनेट आणि वेब सारख्या तंत्रज्ञानाच्या उपयोगाने कार्य अचूक व जलदगतिने होत आहेत. एका ठिकाणाहून खरेदी-विक्री, जाहीरात, शिक्षण, माहिती, संदेश आणि इ-मेल (E-mail) व चॅटग्रुपस् (Chat Groups) मुळे पत्रव्यावहार तसेच विचारांची देवाण-घेवाण होत आहे. तसेच आर्थीक देवाण-घेवाण सुध्दा इंटरनेटमुळे आज शक्य झाली आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात संगणक ही महत्त्वाची संकल्पना (Concept) मानण्यात येते. कारण आज प्रत्येक क्षेत्र संगणकने व्यापलेले आहे. सर्व क्षेत्रामध्ये म्हणजेच विविध कार्यालयात, बँक, शैक्षणिक, औद्योगिक, तसेच करमणूकीच्या (Entertainment) क्षेत्रात याचा दिंवसे दिवस वापर वाढत आहे. आणि साहजीकच संगणक हे मानवी जिवनाची गरज होणार यांत शंका नाही.
संगणक म्हणजे काय ? – What is Computer in Marathi?
संगणक Computer हा शब्द कंम्प्युट Compute या इंग्रजी शब्दापासून बनलेला आहे. कंम्प्युट Compute म्हणजे गणन करणे होय. आणि संगणक म्हणजे एक असा यंत्र जो गणन क्रिया करण्याचे कार्य करतो.
संगणक हे आकडेमोड (Calculation) करणारा तसेच गणन प्रक्रिया करणारे इलेक्ट्रॉनिक यंत्र (Electronic Device) आहे. आदान (Input), प्रदान (Out Put) आणि प्रक्रिया (Process) या तिन स्तरावर कार्य करतो. वापरकर्त्याकडून (User) दिलेली माहिती म्हणज डेटा (Data) आदान साधनरद्वारे (Input Device) संगणकला दिल्यानंतर संगणक त्या डेटावर (Data) प्रक्रिया (Process) करून प्रदान साधनाद्वारे (Output Device) आपणास हवी ती माहिती (Output) किंवा निष्कर्ष उपलब्ध करुन देतो.
संगणकाच्या पिढ्या | Generation of Computers
संगणकाची वैशिष्ट्ये? – Characteristics of Computer?
1. गती Speed
संगणकची कार्य करण्याची गती (Speed) अतिशय जास्त आसते. किचकट व अवघड स्वरूपाचे कार्य संगणक काही सेंकदात करू शकतो. तसेच संगणकच्या क्षमतेनुसार त्याची गती कमी जास्त असू शकते.
2. साठवण किंवा संग्रहन क्षमता Storage Capacity
संगणक साठवणीच्या क्षमतेनुसार (Storage Capacity) महिती साठवत (Store) करतअसतो. संगणकची साठवण क्षमता ही जास्त असते. संगणक मध्ये वेगवगेळ्या प्रकारच्या साठवण माध्यमाचा वापर केला जातो. तंत्रज्ञानाचा होणार विकास यामुळे संगणकची साठवण किंवा संग्रहन क्षमता वाढत आहे.
3. अनेक वापर Versatility
संगणकचा प्रत्येक क्षेत्रात वापर होतो. कार्यालयात, बँक, शैक्षणिक, औद्योगिक अश्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संगणकचे अनेक वापर आहेत. या वैशिष्ट्यामुळे संगणक वेगवेगळया हेतू साठी वापरली जातात.
4. अचुकता Accuracy
संगणक दिलेल्या सुचना व डेटानुसार त्वरेने व अगदी अचुक पणे कार्य करत असतो. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक संच (Electronic Device) असल्याकारणाने संगणक हा अचुकतेने कार्य करत असतो. एखादयावेळी मनुष्याकडुन चुका होऊ शकतील परंतू संगणककडून होणार नाहीत.
5. स्वंयचलीत यंत्र Automation
संगणकला आवश्यक बांबीची पुर्तता केल्यानंतर संगणक त्याचे कार्य आपोआप हताळत असतो. म्हणुन त्याला स्वंयचलीत यंत्र (Automated Device) असे म्हणतात. संगणक हे एक यांत्रीक उपकरण असल्याकारणने तो न थांबता व न थकता काम करू शकतो.
संगणकला ज्या प्रमाणे कार्य करण्याची अज्ञावली दिली जाते त्यानुसार कार्य पुर्ण करतो. वापरकर्त्याच्या अज्ञावली नुसार कार्य करतो परंतु तो स्वता:च्या विचारने यामध्ये काहीही बदल करु शकत नाही.
संगणकचा इतिहास – History of Computer
1. अबॅक्स – ABACUS
11 व्या शतकापूवीर् हिशोबाची गरज भासत नसे. परंतू नंतर व्यापार व आर्थीक सहाय्यतेसाठी हिशोबाची (Calculating) गरज भासू लागली. आणि त्यातूनच सुरवातीस इजिप्त मध्ये पहिल्या गणकयंत्राचा (Calculator) शोध लागला. त्या गणकयंत्राला ऍ़बॅक्सम्हणुन ओळखण्यात येऊ लागले. अबॅक्स (ABACUS) हे एक कॅल्क्युलेटिंग बोर्ड होते. आणि त्यामूळे बेरिज, वजाबाकी, गुणाकार सारखी गणिते करण्यात येऊ लागली.ऍ़बॅक्स हे सर्वात सुरवातीला वापरले गेलेले कॅलक्युलेटिंग डिव्हाईस (Calculating Device) होते.
2. नेपिअर्सबोन्स – Napier’s Bones
जॉन नेपिअर (John Napier) या शास्त्रज्ञाने लॉग तक्ता (Log Table) प्रकाशीत केले त्यास “लॉगारिदम” (Logarithm) असे म्हणतात. त्याअधारे जॉन नेपिअरयर्स या शास्त्राज्ञाने 17 व्या शतकात एक गणकयंत्र (Calculator) तयार केले त्यास नेपिअर्सबोन्स (Napier Bones) या नावाने ओळखले जाऊ लागले. नेपिअर्स या शास्त्रज्ञाने लांब लाकडी जुडग्यावर अंक एका विशीष्ट पध्दतीने मांडले. त्यामुळे या जुडग्यावर अंकांच्या सहाय्याने गणिते वेगाने करण्यात येऊ लागली.
3. स्लाईड रूल – Slide Rule
17 व्या शतकामध्ये एका गणिती तज्ञाने स्लाईड रूल (Slide Rule) नावाच्या गणकयंत्राचा शोध लावला. मागे पुढे सरकावता येतील अश्या लाकडी पट्टयावर अंकांचा व चिन्हांचा वापर केला. जेव्हा गणिते सोडवायची असे त्या पट्टया मागे पुढे करण्यात येत असे. या गणकयंत्राच्या सहय्याने अवघड स्वरूपाची गणिते वेगाने सोडवण्यात येत असे.
4. पास्कल – Pascal
ब्लेझ पास्कल (Blaise Pascal) या 19 वर्षाच्या मुलाने “पास्कलाईन डिजीटल ऍ़डिंग मशीन”(Pascal line Digital Adding Machine) या नावाचे पहीले यांत्रीक गणकयंत्र (Mechanical Calculator) तयार केले. यात दातेरी चक्रे वापरण्यात आलीहोती. या गणकयंत्राच्या (Calculator) सहाय्याने भागाकार, गुणाकार सारखी किचकट उदाहरणे सोडवण्यास वेग आला. या गणकयंत्राला पास्कल (Pascal) या नावाने ओळखण्यात येऊ लागले.
5. पंचेड कार्ड – Punched Card
जोसेफ जॅकवार्ड (Joseph Jacquard) यांनी पंचेड कार्डाची निर्मीती केली. या पंचेड कार्डाचा वापर हरमन होलीरथ या गणिती तज्ञाने विजेवर (Electricity) चलणाऱ्या गणकयंत्रात केला. याचे वैशिष्ट्ये म्हणजे पोस्ट कार्डासारख्या कार्डावर अंकाच्या ठिकाणी चौकोनी छिद्र पाडून त्याचा वापर गणनकार्यासाठी करण्यात आला.
6. ऍ़नालिटीकल इंजिन – Analytical Engine
चार्लस बॅबेज (Charles Babbage), केब्रिज, इंग्लंड (Cambridge, England) येथिल गणिताचे प्राध्यापक (Mathematics Professor) यांनी दोन महत्त्वपुर्ण अश्या वेगळ्या प्रकारच्या मेकॅनिकल कॉम्प्युटिंग इंजिनाचा (A Different Type Of Mechanical Computing Engine) शोध लावला. त्यापैकि पहिले म्हणजे डिफरन्स् इंजिन (Difference Engine) व दुसरे ऍ़नालिटीकल इंजिन (Analytical Engine) होय.
19 व्या शतकात चार्लस बॅबेज (Charles Babbage) यांनी वाफेवर चलणाऱ्या व पुर्णपणे प्रोग्रामद्वारे नियंत्रीत अश्या मेकॅनिकल कॉम्प्युटिंग इंजिनाचा (A Different Type Of Mechanical Computing Engine) चा आराखडा तयार केला. या गणकयंत्राला ऍ़नालिटीकल इंजिन (Analytical Engine) असे म्हणतात.
ऍ़नालिटीकल इंजिन (Analytical Engine) हे सुरवातीचे जनरल परपज कंम्प्यूटिंग डिव्हाईस होते. (General-purpose computing device). या गणकयंत्रात पंचेड कार्ड वापरण्यात आले. हा गणकयंत्र दिलेली माहिती स्विकारुन गणितीप्रक्रिया वेगाने सोडवू शकत असे. तसेच चुका विरहीत कार्य करत असे.
चार्लस बॅबेज यांनी (Charles Babbage) त्या काळी सुचविलेल्या सर्व कल्पनांचा समावेश आजच्या आधूनिक संगणकमध्ये करण्यात आला. म्हणून चार्लस बॅबेज यांना संगणकचे जनक (Father of Computer) असे म्हणतात.
7. व्हॅक्युम ट्युबट्रायोड – Vacuum Tube Triode
पुर्णपणे विजेवर चलणाऱ्या एका उपकरणाचा शोध लागला. त्याला “व्हॅक्युम ट्युब”(Vacuum Tube) असे म्हणतात. व्हॅक्युम ट्युब हे आकारामध्ये एखाद्या बल्ब सारखे होते. व्हॅक्युम ट्युब (Vacuum Tube) चा वापर एनियॉक ENIAC (Electronic Numerical Integrator and Computer) या पहिल्या संगणकमध्ये करण्यात आला. आणि पुर्णपणे डिजीटल संगणक निर्माण करण्यात आला. यामध्ये 30 स्वतंत्र युनिट, 18,000 व्हॅक्युम ट्युबचा वापर करण्यात आला तसेच याचे वजन हे 30 टन होते.
8. ट्रान्झिस्टर – Transistor
एनियॉक नंतर इलेक्ट्रॉनिक्स्ची नवी शाखा उदयास आली. आणि त्यामुळे या क्षेत्रात बरेच संशोधन झाले व त्यातुनच व्हॅक्युम ट्युबचा पर्याय म्हणून ट्रान्झिस्टर (Transistor) चा शोध लागला. ट्रान्झिस्टर हे व्हॅक्युम ट्युब (Vacuum Tube) पेक्षा आकाराने 200 पट लहान होते. व त्यामुळे संगणकाचा आकार कमी झाला व गती मध्ये वाढ होत गेली.
9. आय.सी.- इंटिग्रेटेड सर्किटस् – I.C.- Integrated Circuits
ट्रान्झिस्टर पेक्षाही लहान अश्या सांधनाचा शोध लागला त्याला (I.C.) आय.सी. म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किट् (Integrated Circuits ) असे म्हणतात. (I.C.) आय.सी. हे ट्रान्झिस्टर पेक्षा अकाराने लहान होते व याची कार्य करण्याची गती देखिल ट्रान्झिस्टर पेक्षा जास्त होती. या डिव्हाईसचा वापर संगणक मध्ये करण्यात आला. त्यामुळे संगणकचा आकार लहान होत गेला व गती वाढवण्यात यश आले.म्हणुनच वेगवेगळ्या प्रकारचे संगणक अस्तित्वात आले.
10. चिप – Chip
एका लहान चिपवर (Chip) अनेक आय. सी. (I.C.) व कंपोनेटचा वापर करण्यात आला. या लहान चिपवर अनेक आय.सी. यशस्वीरित्या बसवण्यात यश आले. त्यामुळे अनेक प्रकारचे संगणक अस्तीत्वात आले. तसेच एका चिपवर अनेक आय. सी व इतर कंपोनेटची संख्या वाढवण्याचा प्रयत्न होत आहे.