संगणक विश्वातील मनोरंजक तथ्य | Computer Facts in Marathi
1. विन्डोज डॉस ओ.एस. (Windows DOS OS)
विन्डोज ओ.एस. (Windows Operating System) मध्ये CON, AUX, NUL व PRN या नावाने फोल्डर बनवता येते नाही. कारण अश्या प्रकारची शब्द DOS या ऑपरेटिंग सिस्टीम साठी रक्षित करण्यात आली आहेत.
यु-ट्युब (YouTube)
जगप्रसिद्ध व्हीडीओ शेअरींग चॅनल “यु-ट्युब (YouTube)” ची निर्मीती 14 फेब्रुवारी 2005 मध्ये पेपल “PayPal” कंपनीच्या तीन कर्मचा-सांनी केली होती. या मध्ये चाड हर्ले (Chad Hurley), स्टिव चेन (Steve Chen) आणि जावेद करीम (Jawed Karim) अशी यांचे नावे आहेत. नंतर गूगलने ही कंपनी खरेदी केली. यु-ट्युब आज जगामधील दुस-या क्रमांकाची सर्वात जास्त वापरली जाणारी वेबसाईड आहे.
इंटेल 4004 (Intel 4004)
जगप्रसिद्ध कंपनी “इंटेल” जे कॉम्प्युटर ब्रेन समजना जाणार्या मायक्रोप्रोसेसरची निर्मीती करण्यात जगभर प्रसिद्ध आहे, सन 1971 मध्ये “INTEL 4004” या पहील्या मायक्रोप्रोसेसरची निर्मीती केली आणि याचा वापर कॅल्क्युलेटर मध्ये केलेला होता.
इंटरफेस मॅनेजर (Interface Manager)
आपणा सर्वांना मायक्रोसॉफ्ट विंडोज माहित आहे, नक्कीच याचा वापर आपण कधीतरी केला आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का? की मायक्रोसॉफ्ट विंडोजचे मूळ नाव इंटरफेस मॅनेजर होते.
इमोजी (Emoji)
सप्टेंबर 19, 1982 मध्ये स्कॉट फाहलमैन (Scott Fahlman) यांनी सर्वप्रथम इमोकॉन “Emoticon” ची संकल्पना आणली. या मध्ये सर्वसाधारण मनुष्याचे भाव-भावना एका विशिष्ठ अक्षर (Text Based) आणि खास चिन्हे (Special Character) वर आधारित सांकेतीक स्वरुपामध्ये मांडण्यात आली. आज आपण यांना “इमोजी Emoji” नावाने देखिल ओळखतो.
पहीली संगणक हार्डडिस्क (First Computer HDD)
सन 1956 मध्ये पहीली संगणक हार्डडिस्क आय.बी.एम. IBM या कंपनी मार्फत प्रस्तुत करण्यात आली. “RAMAC 305” या सिस्टीम मध्ये याचा वापर केला गेला. या हार्ड डिस्कची संग्रहण क्षमता 5 MB होती.
ब्लॉग म्हणजे काय? What is Blog? ब्लॉगिंग काय असते?
पहिला संगणक माऊस (First Computer Mouse)
जगातील पहिला माऊस सन 1960 मध्ये डॉ. डगलस इंजेलबर्ट (Dr. Douglas Engelbart) यांनी तयार केला होता. याचे सुरवातीचे नाव “X-Y Position Indicator for Display System (एक्स-वाय पोझिशन इंडिकेटर फोर डिसप्ले सिस्टम)” असे होते. 1973 मध्ये “Xerox Alto Computer System (झेरॉक्स अल्टो कॉम्प्युटर सिस्टम)” मध्ये याचा पहिल्यांदा वापर केला गेला.
क्वर्टी कि-बोर्ड (QWERTY Keyboard)
1870 च्या दशकामध्ये Christopher Latham Sholes क्रिस्टोफर शॉलस् यांनी QWERTY किं-बोर्ड ले-आऊटची रचना केली. 1874 मध्ये “शॉलस् अँड ग्लिडन टाईपराईटर” पहिले आणि पुर्णपणे QWERTY या कि-बोर्ड ले-आऊट वर आधारीत असलेले कि-बोर्ड होते. ले-आऊट म्हणजेच अक्षरांची ओळीं मधील क्रमबदध रचना होय. आपल्या संगणकाचे कि-बोर्ड चे सुरु होणारे पहिले सहा अक्षरे Q-W-E-R-T-Y असे आहेत म्हणून याला QWERTY Keyboard म्हणतात.
लॅटिन स्क्रिप्टचा आधार घेऊन अक्षर, अंक आणि चिन्हांची स्थानानुसार रचना केलली आहे. टाईपरायटर किंवा आजच्या संगणक कि-बोर्डवरती याच पद्धतीने अक्षरांचा क्रम व स्थान वापरला जातो. A-Z असा क्रम न वापरता Q-W-E-R-T-Y असा क्रम वापरला जातो तसेच टाईपिंग साठी हा सर्वात सोपा कि-बोर्ड लेआऊट मानला जातो.
पहिली महिला संगणक प्रोग्रामर
चार्ल बॅबेज द्वारा प्रस्तावित पहिल्या यांत्रिकी जनरल परपज कॉम्युथाटर “ॲनालिटीकल इंजिन” या प्रसिद्ध संगणक सम कॅक्लयुलेटर साठी त्यांनी अल्गोरिदमची रचना होती. म्हणुनच एडा लव्हलेस (Ada Lovelace) यांना पहिली महिला संगणक प्रोग्रामर (First Women Computer Programmer) म्हणून ओळखले जाते.
symbolics.com
जगातील पहीला .com नोदणी/रजिस्टर केलेले डोमेन नेम symbolics.com आहे.
TYPEWRITER
TYPEWRITER हा एक अशी अधिक अक्षरे असलेला शब्द आहे की जो कि-बोर्डच्या एकाच ओळीमधील अक्षरा पासुन बनतो.
जागतिक संगणक साक्षरता दिवस
प्रत्येक वर्षी 2 November “जागतिक संगणक साक्षरता दिवस (World Computer Literacy Day)” म्हणुन साजरा केला जातो.
WWW
सर टीम बर्नर्स ली जागतिक माहिती जालाचे WWW (World Wilde Web वर्ल्ड वाईल्ड वेब) जनक आहेत.
30 November
प्रत्येक वर्षी 30 November “संगणक सुरक्षा दिवस (Computer Security Day)” म्हणुन साजरा केला जातो.