दैनंदिन जिवनामध्ये मोबाईल आणि संगणक एक गरजेची वस्तु झालेली आहे आणि या साधनांमध्ये मध्ये “गूगल”. सर्च इंजिन (Search Engine) म्हणुन गूगलचा सुरु झालेला प्रवास आज नव-नवीन संशोधन (Research) व संगणक जगामध्ये एक क्रांती निर्मान करत आहे. आज स्थितीला गूगलची व्याप्ती एवढी वाढली आहे की काहीही जर शोधायचे असेल तर त्याला आपण “गूगल” कर अशी सुचना देतो किंवा पर्याय सुचवतो.
गूगल ने अल्पावधीतच अनेक नवीन शंशोधन व सर्च इंजीन मध्ये केलेल अनेक सुधारणा व अद्यावतेने इंटरनेट म्हणजेच “गूगल” झालेले आहे. अनेक प्रकारच्या ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. गूगल डॉक, गूगल ड्राईव्ह, गूगल फोटोज, जिमेल, गूगल मॅप, ब्लॉगर, …. सारख्या अनेक गूगलच्या लोकप्रिय सेवांचा वापर आपण दैनंदिन जिवनात करत आहोत तेही अगदी मोफत.
गूगल ने उपलब्ध करुन दिलेल्या अनेक सेवेमध्ये ‘गूगल ट्रान्सलेट’ एक प्रचलित व भांषातरासाठी सर्वात जास्त वापरली जाणारी गूगलची सेवा आहे. ‘गूगल ट्रान्सलेट’ द्वारे एखादया भाषेमध्ये उपलब्ध असलेले माहिती कोणत्याही भाषेमध्ये सहज भांषातर करुन त्यांचा काय अर्थ होतो हे जाणून घेऊ शकतो.
अनुक्रमनिका
भाषांतर म्हणजे काय?
गूगल ट्रांसलेट सेवा संदर्भात माहिती घेण्यापूर्वी भाषांतर काय असते? याची माहिती करून घेऊ. एखाद्या विशिष्ट भाषेमधली माहिती कोणत्याही दुसऱ्या भाषेमध्ये बदलणे यालाच भाषांतर असे म्हणतात. भाषांतर मध्ये प्रत्येक शब्दाला त्या-त्या भाषेमध्ये विशीष्ठ अर्थ असतात तसेच त्यांचे उच्चारण (Pronunciation) व व्याकरणही (Grammar) तितकेच महत्वाचे असतात. भाषांतर करताना या सर्व गोष्टींचा विचार केला जातो.
भाषांतर सेवा उपलब्ध करुन देणारे संकेतस्थळ यांच्या मार्फत निवडलेल्या भाषेनुसार त्याचा अर्थ, उच्चारण व व्याकरण व्यवस्थित नियोजीत केलेले असतात जेणेकरून भाषांतरीत माहिती अचुक उपलब्ध होईल.
इंटरनेट वर जास्तीत जास्त संकेतस्थळ व त्यामधील माहीती इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. इंग्रजी भाषाचे ज्ञान असणा-या व्याक्तीला ते सहज वाचता येईल किंवा ती माहीती त्या व्याक्तीला सहज समजेल. परंतू एखाद्या व्याक्तीला इंग्रजीचे आवश्यक ते ज्ञान नसेल किंवा त्याला इंग्रजी भाषा समजत नसेल तेव्हा? या ठिकाणी हा प्रश्न निर्मान होतो आणि येथुन गरज निर्मान होतो भाषांतर सारख्या सोयिंची!
गूगल ट्रान्सलेट – (Google Translate Marathi)
भाषांतर साठी गूगलची प्रचलित सेवा गूगल ट्रान्सलेट मोठया प्रमाणात वापरली जाते. कोणत्याही भाषेत उपलब्ध असलेले साहित्य, लेख, पुस्तके, वाक्य, शब्द, तसेच संपुर्ण संकेतस्थळ यांना कोणत्याही उपलब्ध भाषेत भाषांतरित करण्याकरिता गूगल ट्रान्सलेट हे लोकप्रिय व सर्वात जास्त वापरले जाणारे संकेतस्थळ आहे.
गूगल ट्रान्सलेट वापरकर्त्याला भाषांतरासाठी अनेक पर्याय व प्रगत सुविधा उपलब्ध करुन देतो. गूगल ट्रान्सलेट द्वारे मिळणारे भाषांतराचे परीणाम यामध्ये त्रुटि कमी प्रमाणात असतात. तसेच भाषांतरसाठी निवडलेल्या दोन भाषेमध्ये गूगल ट्रान्सलेट “दुवा” म्हणुन कार्य करतो जो एका भाषेतील माहीती दुस-या भाषेत भाषांतरीत करतो.
गूगल भाषांतराचे संकेतस्थळ
https//translate.google.com किंवा https//translate.google.co.in हे गूगल ट्रान्सलेट सेवा संकेतस्थळाचा यु.आर.एल. (URL – Uniform Resource Locator) म्हणजेच पत्ता आहे. इंटरनेट ब्राऊजर च्या मदतीने संकेतस्थळ जेव्हा उघडला जातो तेव्हा या विन्डो मध्ये भाषांतर साठीचे अनेक पर्याय दिलेली असतात. या पर्यायाचा वापर कसे करावे? हे आपण पाहणार आहोत.
आर्टिफिशीयल इंटेलिजन्सची सुरवात…
गूगल ट्रान्सलेट कसे वापरावे?
गूगल ट्रान्सलेट हे संकेतस्थळ जेव्हा इंटरनेट ब्राऊजर मध्ये उघडला जातो तेव्हा या विन्डो मध्ये “टेक्स्ट” व “डॉक्युमेंट” (Text & Document) असे दोन पर्याय दिलेली असतात. टेक्स्ट पर्यायाचा वापर करुन साधारण पणे आपण कि-बोर्ड द्वारे टाईप (Type) केलेले किंवा इतर ठिकाणाहून प्रतिलीपी (Copy) केलेले टेक्स्ट स्वरुपातील माहीती पेस्ट (Paste) करुन भाषांतरीत परीणाम आपल्या भाषेत मिळवता येतात.
गूगल ट्रान्सलेट संकेतस्थळच्या विन्डोमध्ये दोन चौकटी दिलेल्या असतात. पहिल्या चौकटीमध्ये भाषातर करावयाची माहीती द्यावयाची असते तर दुस-या बाजूच्या चौकटीत भाषांतरीत झालेली माहीती दर्शवली जाते. गुगल ट्रान्सलेट संकेतस्थळाला कोणत्या भाषेत माहीती द्यवयाची आहे व ती माहीती कोणत्या भाषेत हवी आहे ती भाषा या ठिकाणी निवडणे गरजेचे असते.
गूगल ट्रान्सलेट मध्ये एका वेळी एकाच विन्डो (Window) मध्ये 5000 (पाच हजार) पर्यंतचे शब्द भाषांतरीत करण्याची सोय आहे. सद्यस्थितीला 109 भाषांमध्ये गुगल ट्रान्सलेट ची सेवा भाषांतरासाठी उपलब्ध आहे. म्हणजेच जवळपास 109 भाषेमध्ये आपण भाषांतर मिळवू शकतो.
भाषांतर करण्याच्या पद्धतीनुसार याची आपण 3 विभागात वर्गीकरण करु शकतो जेणेकरुन या विषयीची माहीत सहज सोप्या पद्धातीने अभ्यासता येईल.
1. टेक्स्ट भाषांतर
मजकूर म्हणजेच टेक्स्ट यामध्ये शब्द, वाक्य किंवा एखादा संपूर्ण परिच्छेद (Paragraph) यांचा समावेश होतो. हे मजकूर आपण टाईप केलेले असू शकते किंवा संकेतस्थळ व इतर स्रोतापासून प्रतीलीपी (Copy) केलेले असते असे शाब्दिक (Text) स्वरूपातील माहिती भाषांतरित केली जाते त्याला टेक्स्ट ट्रान्सलेशन म्हणजे शाब्दिक भाषांतर असे म्हणतो. तसेच हे भाषांतर आपण थेट (Live) स्वरूपात पाहू शकतो.
वेगवेगळ्या भाषेमध्ये शब्दांचे उच्चारण, त्यांचा काय अर्थ होतं ? यासाठी हे एक प्रकारचे सुनिरूचीत केलेले मूलभूत भाषांतर करण्यासाठी पर्याय वापरतो यालाच आपण टेक्स्ट ट्रान्सलेशन म्हणजेच शाब्दिक भाषांतर असे म्हणतो. तसेच हे भाषांतर आपण थेट (Live) स्वरूपात पाहू शकतो.
2. संकेतस्थळ भाषांतर
इंटरनेट वापर करून (Surfing) आपण अनेक संकेतस्थळांना भेट (Visit) देतो. यामध्ये बहुतेक संकेतस्थळ हे इंग्रजी भाषेमध्ये असतात. आता या संकेतस्थळ मध्ये माहिती साहजिकच आपल्याला वाचायची असेल तर इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. परंतु आपणास ही माहिती आपल्या मातृभाषेमध्ये हवी असल्यास ती कशी भाषांतरीत करायची याची ची एक सोपी पद्धत आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
यासाठी संकेतस्थळाचा पुर्ण पत्ता म्हणजेच यु.आर.एल. (URL) सर्च बॉक्स मध्ये टाईप करावा लागतो. उदा. “www.theitworld.in” भाषांतराच्या दुस-या भागामध्ये ती भाषा निवडावी लागेल ज्या भाषेमध्ये संकेतस्थळ हवा आहे. तर चला संकेतस्थळ तयार आहे भाषांतरासाठी… फक्त उपलब्ध हायपलिंक वरती क्लिक करा आणि पहा संकेतस्थळ आपल्या निवडलेल्या भाषेमध्ये.
एखादे संकेतस्थळाचे जेव्हा भाषांतर केले जाते तेव्हा त्या संकेतस्थळाचे फक्त मजकूर भाषांतरीत होतात संकेतस्थळाच्या स्वरुप (Format) व आराखडा (Layout) यामध्ये कोणतेही बदल केले जात नाही.
3. टेक्स्ट व डॉक्युमेंट फाईल्स यांचे भाषांतर
डॉक्युमेंट फाईल मध्ये जास्तीत जास्त मजकूर (Text) यांचा समावेश असतो. अशा प्रकारच्या फाईल गुगल ट्रान्सलेशन च्या मदतीने भाषांतरित करता येतात. डॉक्युमेंट या पर्यायाचा वापर करून आपणास ज्या डॉक्युमेंट चे भाषांतर करायचे आहे ते डॉक्युमेंट संकेतस्थळावरती अपलोड करावे लागते. अपलोड केल्यानंतर निवडलेल्या भाषेमध्ये या मधील सर्व मजकूर भाषांतरित करून दिले जाते.
वर्ड डॉक्युमेंट, टेक्स्ट डॉक्युमेंट, एक्सेल फाईल (Excel File), प्रजेंटेशन व इतर फाईलस् यामधील माहिती निवडलेल्या भाषेमध्ये भाषांतरित करून मिळवता येते. यामध्ये जवळपास .doc, .docx, .odf, .pdf, .ppt, .pptx, .ps, .rtf, .txt, .xls, or .xlsx इत्यादी प्रकारच्या फाईल व डॉक्युमेंट फाईल्सचा वापर भाषांतरासाठी करता येऊ शकतो.
गूगल ट्रान्सलेटचे इतर सुविधा व वैशिठ्ये
1. ऑडिओ इनपुट
व्हाईस इनपुट सांधनांचा वापर करुन संगणक, लॅपटॉप, किंवा मोबाईल द्वारे आवाजच्या (Voice) स्वरूपात माहिती देता येते. म्हणजेच आपण जे काही बोलतो ते मजकूर या ठिकाणी टाइप (Type) केली जातात. म्हणजेच आपण उच्चारलेल्या शब्द टेक्स्ट मध्ये बदलले जाते आणि या स्वरुपात टाइप केलेली माहिती आपण निवडलेल्या भाषेत भाषंतरित केली जाते.
2. स्पेलिंग व व्याकरणातील चुका
भाषांतरसाठी दिलेली माहिती किंवा मजकूर (Text) यांच्यात शब्दलेखन व व्याकरणातील चुका (Spelling किंवा Grammatical Mistake) असतील तर त्यासंबधी सुधारणा (Edit) आणि ते कसे असायला हवे? किंवा यामध्ये कशी सुधारणा हवी? याचे मार्गदर्शन व सुचना (Suggestion and Instruction) त्या खालोखाल दर्शवलेले असते.
एखादया शब्दाचे उच्चारण कसे आहे? किंवा कसे असावे? यासाठी ‘स्पीकर आयकॉन’ मध्ये ऑडिओ लिसन (Listen) म्हणजेच शब्दांचे उच्चारण ऐकण्यासाठी हा पर्याय उपलब्ध असतो याचा वापर करता येतो.
एखादा शब्द हा वाक्यात कसा वापरला जातो, क्रियापद (Verb), समानअर्थी शब्द (Synonyms), याचेही पर्याय उपलब्ध करून दिलेले असतात. हे वापरणे अतिशय मनोरंजक आहे.
3. अनुवादित माहितीची प्रतिलीपी कशी करावी?
गूगल ट्रांसलेट मध्ये अनुवादित केलेली माहिती त्या खालोखाल प्रतिलीपी साठीचा प्रतिमा म्हणजेच आयकॉन दिलेला असतो हा पर्याय निवडून अनुवादित केलेली संपूर्ण माहितीची प्रतिलीपी करता येते.
4. सुधारणा व संपादन
भाषांतर करून मिळालेली माहिती अगदी बरोबर किंवा नियमानुसार असेल असे नसते यामध्ये काही त्रुटी (Error)आसण्याचा संभव असतो. अशा त्रुटी संदर्भातील माहिती आपण गुगल ला देऊ शकतो. थोडक्यात भाषांतर किंवा भाषांतरीत माहीती कशी असावयाला हवी यासंबधी माहीत देण्यासाठी “सुधारणा सुचवा” (Editing Suggest) या पर्यायाचा उपयोग करतात.
जेणेकरून भविष्यामध्ये या पद्धतीची माहिती जेव्हा भाषांतरित केली जाते तेव्हा त्यामध्ये आपण केलेल्या सुधारणा विचारात घेतल्या जातात जेणेकरून भाषांतर अचूक व त्रुटी रहित (Accurate & Error Free) परिणाम (Result) उपलब्ध करून देऊ शकेल.
5. सामायीक म्हणजेच शेअर कशी करायची
भाषांतरीत झालेली माहिती ईमेल किंवा इतर पध्दतीने इतरांसोबत समायीक (Share) करायची असेल किंवा विभागूण वापरायची असेल तर शेअर या पर्यायाचा उपयोग करतात.
गूगल ट्रान्सलेट मधून भाषांतरित करून मिळालेली संपूर्ण माहिती तंतोतंतच बरोबर असेल याची खात्री देता येत नाही. काही शब्द किंवा काही वाक्य यांचे भाषांतरण आणि उच्चरण यांच्यात काही त्रुटी असण्याचा संभव असतो. आणि गूगल ट्रान्सलेट या चुका कमी करण्यासाठी व भाषांतराचा दर्जा सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.
सारांश
गूगल ट्रान्सलेट भाषांतरासाठी प्रभावी आणि सर्वात जास्त वापरले जाणारे टुल आहे. जगभतरातील अनेक भाषांचे कोणत्याही भाषेत बहुतांशी चुकाविरहीत भाषांतर करण्यास सक्षम आहे. टेक्स्ट वर आधारीत भाषांतरसह संपुर्ण संकेतस्थळ आणि डॉक्युमेंटचे भाषातर करणारे एकमेव टुल आहे. सहज आणि सोष्या पद्धतीने इंटरफेस असल्याकारणाने कोणीही याचा वापर करु शकतो.
“गूगल ट्रान्सलेट म्हणजे काय?” ब्लॉगच्या माध्यमाने मराठीमध्ये याचा वापर कश्या पद्धतीने करावे याची विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. या विषयीच्या प्रतिक्रीया, सुचना, आणि अभिप्राय कमेंट मध्ये आवश्य नमुद करा. धन्यवाद!
खूपच उपयोगी माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद 🙏