10 सर्वोत्तम मराठी ब्लॉग विषय

ब्लॉग लिहणारा लेखक हा ब्लॉगर म्हणुन ओळखला जातो हे आपणास माहित असेलच. ब्लॉगर ब्लॉग लिहण्याची सुरवात करण्यापुर्वी तो विषय निवडत आसतो, जो एक महत्वाचे पाऊल असते. ब्लॉगचा विषय निवडताना ब्लॉगरची संभ्रम स्थिती समजुन घेऊ श्कतो. या समस्येच्या समाधानासाठी या ब्लॉगच्या माध्यमाने महत्वाचे मुख्य असे 10 सर्वोत्तम ब्लॉग विषयांची (Top 10 blog topics in Marathi) माहिती देत आहोत निश्चीतच हे आपणास उपयुक्त होईल.

ब्लॉग विषय म्हणजे काय? (What is Blog Topics or Ideas?)

तुमचे लेख म्हणजेच ब्लॉग कोणत्या विचार, कल्पना किंवा संदर्भाच्या आणारे माहिती देत आहे तो आशय म्हणजेच तुमच्या ब्लॉगचा विषय होय. ब्लॉगच्या विषयानुसार संकेतस्थळाचे प्रारुप, लेखनशैली, माहितीचे आधार, आशय व अर्थ, चित्रे आणि मजकुर त्या विषयानुसार मांडलेली असतात. ब्लॉगचा विषय संपुर्ण संकेतस्थळ आणि ब्लॉग पोस्टची ओळख असते कारण विषयानुसार ब्लॉग लिहली जातात तसेच इंटरनेटवरती शोधली देखिल जातात.

उदा. एखादे संकेतस्थळ तंत्रज्ञानावर आधारीत माहिती देत आहे तर तो “तंत्रज्ञान ब्लॉग” या श्रेणी मध्ये येतो. तंत्रज्ञान या विषयमाध्ये संगणक, मोबाईल, अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती, तंत्रज्ञानाचे भविष्यात, तंत्रज्ञाना मध्ये होणारे संशोधन व शोध, त्याचा मानवी जिवनावर होणारे परीणाम… अशी अनेक विषयावर माहिती व मार्गदर्शीका लिहलेली असते.

Top 10 blog topics in Marathi

ब्लॉग विषय कसे निवडायचे? (How to Choose Blog Ideas?)

ब्लॉगचा विषय निवडवणे तसे सोपे आहे परंतू गोंधळाची स्थिती निर्मान करणारी क्रिया आहे. ब्लॉगचा विषय निवडण्यापुर्वी काही प्रश्नांची उत्तरे स्वता: ला विचारा. जसे कोणत्या विषयामध्ये तुमची रुची आहे? तुम्हाला कोणत्या विषयाचे ज्ञान अधिक आहे? तमचे लेखन कौशल्य कोणत्या विषयावर सहज लिहता येणे योग्य आहे? या सर्व प्रश्नांचे जे एकच उत्तर येईल तो तुमचा ब्लॉग विषय म्हणुन निवडु शकता.

ब्लॉगींगची सुरवात करताना ब्लॉग विषय निवडणे पहिले आणि महत्वाचे पाऊल आहे. ब्लॉग विषय निवडताना तुमचे त्या विषया संदर्भातील अनुभव, ज्ञान, लेखन पद्धती आणि कैशल्याचे परीक्षण करा. त्यामुळे ब्लॉगचा विषय निवडताना सोपे जाईल. ब्लॉग उत्तम, ज्ञानपुर्ण सहज सोप्या भाषेमध्ये लिहणे हे कैशल्य आहे आणि हेच यशस्वी आणि उत्तम ब्लॉगरची ओळख असते.

10 सर्वोत्तम मराठी ब्लॉग विषय (10 Niche Blog Topics in Marathi)

1. शैक्षणिक ब्लॉग (Educational Blog Ideas in Marathi)

शिक्षण आजच्या काळाची गरज आहे आणि वाचकांची गरज लक्षात घेता तुम्ही शिक्षण या निश वर ब्लॉग लिहु शकता. एक ब्लॉगर म्हणुन ब्लॉगची सुरवात करण्यापुर्वी कोणत्या शिक्षण विषयामध्ये तुमची रुची आहे ते तपासा. शैक्षणिक विषयामध्ये शिक्षणाच्या अनेक शाखा आहेत जसे भाषा, विज्ञान, इतिहास, भुगोल, गणित, जिवशास्त्र, अर्थशास्त्र, तंत्रज्ञान, संगणक… असे किती तरी विषय आहेत ज्यावरती ब्लॉग लिहता येऊ शकतात.

शिक्षणाच्या कोणत्या विषयामध्ये तुमची रुची आणि ज्ञान आहे तो विषय तुमच्या ब्लॉगचा विषय म्हणुन निवडु शकता. खाली दिेलेल्या विषया पैकि कोणते विषय तुमच्या वाचकांना आवडतील किंवा तुमचे लेखन कौशल्य कोणत्या क्षेत्रामध्ये आहे त्या गोष्टींचा विचार करुन ब्लॉग विषयाची निवड केलेली उत्तमच !

शैक्षणिक ब्लॉगचे विषयमाहिती
ई-लर्निंग शिक्षण (E-Learning)ऑनलाईन शिक्षण देणारे ब्लॉग म्हणजेच ई-लर्निंग व्यासपीठ होय. ऑनलाईन शिक्षणामध्ये विषयानुसार मार्गदर्शन, गाईडस्, ट्युटोरिअल सारख्या संकेतस्थळांचा समावेश होतो.
शैक्षणिक तंत्रज्ञान (Education Technology)ऑनलाईन शिक्षण प्राप्त करण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांना कोणकोणती माध्यमे, डिजीटल टुल, क्लासरुम तंत्रज्ञान आणि ऍप्लीकेशनचा वापर होऊ शकतो या निशवरती ब्लॉग लेखन केलेले असते.
क्विज ब्लॉग (Quiz Blog)संगणक, विज्ञान, गणित, सामान्य ज्ञान… या सारख्या अनेक विषयावर प्रश्नसंच म्हणजेच प्रश्न-उत्तारांची मालिका ब्लॉगच्या स्वरुपात प्रकाशित करु शकता.
निंबध आणि शोध (Essay & Research)निबंध, शोध, आर्टीकल, नोटस्, लेखन, अभ्यासक्रम, परीक्षांची माहिती, प्रश्नोत्तरे, FAQs, लर्निंग टेक्नीक या विषयां वर मार्गदर्शक ब्लॉग प्रकाशित करता येऊ शकतात.
भाषा ज्ञान आणि अध्ययन (Language and Learning)जगामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात, या भाषा शिकण्यासाठी इंटरनेटचा वापर करणारे बरेच जण आहेत. अश्या वाचकांसाठी भाषा ज्ञान, व्याकरण, उच्चारण अश्या लेखनाच्या माध्यमाने मार्गदर्शन करणारे ब्लॉग लिहता येऊ शकतात.
Educational Blog Ideas in Marathi

🔸 ब्लॉग म्हणजे काय? What is Blog in Marathi?
🔸 ब्लॉग पोस्ट कसे लिहावे?
🔸 ब्लॉगर.कॉम काय आहे?

blog ideas in marathi

2. तंत्रज्ञान ब्लॉग (Technology Blog Ideas)

आज प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. तंत्रज्ञानामुळे कार्य जलद गतिने करणे सोपे झाले आहे. संगणक, मोबाईल आणि इतर तंत्रज्ञान विषयक ब्लॉगची सुरवात तुम्हाला करता येऊ शकते. संगणक तंत्रज्ञान, ऍप्लीकेशनची माहिती, ट्युटोरिअल, रिव्ह्युव्ह लेखन, परीक्षणे टिप्स् आणि ट्रिकस् सारखे संगणक विषयामध्ये रुची असणा-या वाचकापर्यंत ब्लॉगच्या माध्यमाने पोहचता येते.

संगणक आणि मोबाईल साठी उपयुक्त असणारे सॉफ्टवेअरची माहिती, परीक्षणे, वापरण्याच्या पद्धती… असलेले ब्लॉग या विषयांर्तग येतात. उत्पादनाची समीक्षा, AI, क्वांटम कॉम्प्युटर, ट्युटोरिअल, भविष्यातील तंत्रज्ञान, मोबाईल आणि संगणक संशोधन ब्लॉग, शोशल मिडीया, नवीन तंत्रज्ञान यासारखे अद्यावत विषय तंत्रज्ञान ब्लॉगचा भाग असतात. मोबाईल आणि संगणक संबधी अनेक विषयावर आधारीत ब्लॉग लिहली जाऊ शकतात.

तंत्रज्ञान ब्लॉग विषयमाहिती
मोबाईल तंत्रज्ञान (Mobile Reviews)मोबाईल तंत्रज्ञान, रिव्ह्युव्ह लेखन, परीक्षणे, अद्यावत तंत्रज्ञाना विषयी माहिती देणारे ब्लॉग एक उत्तम विषय आहे.
संगणक तंत्रज्ञान (Computer Technology)संगणकाचे मुलभत ते प्रगत ज्ञान आणि माहिती, संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची माहिती, ट्युटोरिअल, रिव्ह्युव्ह लेखन, परीक्षणे, टिप्स आणि ट्रिक्स्, संगणक व्हायरस आणि ॲन्टीव्हायरस ऍप्लीकेशन… सारखे विषयासह संगणक विषयामध्ये रुची असणा-या वाचकापर्यंत ब्लॉगच्या माध्यमाने पोहचता येते.
संकेतस्थळ आणि ब्लॉगिंग (Website, SEO & Blogging)संकेतस्थळ काय असते? ते कसे तयार करतात?, ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय? SEO काय असते? या विषयावरती प्राथमिक ते प्रगत स्तरावर माहिती देणारे ब्लॉग आणि ट्युटोरिअलचा समावेश असलेले ब्लॉग प्रकाशित करता येतात.
नेटवर्कींग (Networking)नेटवर्कीग म्हणजे काय असते? त्याचे प्रकार, उपयोग, उद्यावत तंत्रज्ञान या विषयीच्या महितीचा समावेश या ब्लॉग विषयांतर्गत करता येतो.
टेक न्युज & अपडेट (Tech News and Update)व्हर्च्यअल रियालटी, आर्टीफिशल इंटेलिजन्स, 4G & 5G तंत्रज्ञान, क्वांटम कॉम्प्युटर, शरीरा वरती वापरण्यायोग्य साधने (Wearable Devices), तसेच नवीन तंत्रज्ञाना विषयी अद्यावत माहिती देणारे ब्लॉग या शिर्षक आंतर्गत लिहता येऊ शकतात.
सॉफ्टवेअर व ॲप विषयक ब्लॉग (Software and Apps Reviews)संगणक आणि मोबाईल साठी उपयुक्त असणारे सॉफ्टवेअरची माहिती, परीक्षणे, वापरण्याच्या पद्धती… विषयक ब्लॉग या विषयांर्तग येतात.
Technology Blog Ideas in Marathi

📌 Useful Tips : ब्लॉग लिहण्याचा प्राथमिक उद्देश फक्त पैसे कमावणे पुरते मार्यादित नसुन एक उत्तम आणि ज्ञानवर्धक माहिती वाचकांना उपलब्ध करुन देणे असते. वाचकांच्या आवडीस उतरलेले ब्लॉग तुम्हास उत्तम वाचकवर्ग निर्मान करण्यास उपयोगी पडेल.

3. फुड ब्लॉग (Food Blog Ideas in Marathi)

चविष्ठ आणि रुचकर जेवन कोणाला आवडत नाही? तुमची या विषयात रुची असेल तर तुम्ही एक फुड ब्लॉगर म्हणुन तुमच्या करीअरची सुरवात करु शकता. आहार आणि दैनंदिन खाद्यपदार्था संबधीत माहिती देणारे फुड ब्लॉग एक उत्तम निश आहे. फुड ब्लॉग द्वारे रेसिपी, आहार संदर्भातील सुचना आणि मार्गदर्शक माहिती वर लेख लिहु शकतात.

रेसिपी, आहार आणि खानपान संबधीत माहिती, स्वयंपाकच्या पद्धती आणि सुचना, शेफ प्रतियोगिता, आहार आणि स्वास्थ तसेच रेस्टॉरंट आणि हॉटेल संबधीत सेवा आणि रिव्ह्युव्ह असे अनेक विषय तुम्ही तुमच्या फुड ब्लॉगींगसाठी निवडु शकता.

फुड ब्लॉग विषयमाहिती
रेसिपी (Recipes and Meal)चविष्ठ स्वयंपाक कसा बनवायचा? या विषयीचे स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन म्हणजेच रेसिपी होय. असे अनेक फुड ब्लॉग आहेत ज्यांच्या रेसिपीमध्ये सर्व माहिती विस्तृत पणे मांडलेली असते. शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे जेवन बनवण्याच्या नव्या शैलीची रेसिपीज् ब्लॉग मध्ये समाविष्ट करता येतात.
आहार विषयक ब्लॉग (Dieting Guide and Tips)वयोमानानुसार असलेले आहार, आजारपणामध्ये देण्यात येणारे आहार, स्वास्थवर्धक फळ व पालेभाज्या, पेय, आईसक्रिम, सण-वारामध्ये बनवण्यात येणारे स्वंयपाक या आशयाचे ब्लॉग विषयांतर्गत लिहु शकता.
रेस्टॉरंट & हॉटेल रिव्ह्युव्ह ब्लॉग (Restaurant and Hotel Reviews)रेस्टॉरंट, कॅफे आणि हॉटेल मध्ये कोणते खास मेन्यु आणि जेवण मिळते त्यासंबंधी माहिती तसेच रेटिंगचा समावेश असलेले ब्लॉग या विषयांतर्गत देऊ शकता.
स्वास्थ आणि आहार (Health and Food)आहार आणि स्वास्थ यांचा खुप जवळचा संबध आहे. आहारामध्ये कोणते पदार्थ शरीरासाठी चांगले आहेत? फळांची, पालेभाजी, ड्रायफ्रुट, कडधान्य, पेय, संदर्भातील उपयुक्त माहिती विषयानुसार ब्लॉग द्वारे लिहु शकता.
Food Blog Ideas in Marathi in Marathi

4. आवड आणि रुची (Hobbies & Interests Blog Ideas)

प्रत्येक व्याक्तीची कोणत्या न कोणत्या क्षेत्राध्ये आवड किंवा रुची असते. या प्रकारचे ब्लॉग खासकरुन विशीष्ठ आवड असलेल्या व्याक्तींच्या आवड आणि रुची तसेच कलागुणांना वाव देणारे असतात. कल्पकता, विचारशक्ती, कौशल्या, ज्ञान, संबधीत मार्गदर्शन् करणारे, माहिती प्रदान करणारे विषय ब्लॉगिंग साठी उपयुक्त आहे. एक सारखी आवड असणारे व्याक्तिंचा समुह ब्लॉगद्वारे जोडला जाऊ शकतो.

साहित्य वाचन आणि समिक्षा, लेखन, चित्रकला, संगित, नृत्य, पोहणे, अभिनय, असे ब्लॉग विषय “आवड आणि रुची” आंतर्गत लिहता येतात. ब्लॉगिंग मध्ये आवड-निवड, रुची विषयीची माहिती, सुचना, ज्ञान, आणि अनुभव अश्या अनेक विषयावर माहिती ब्लॉग द्वारे प्रदान केली जाते.

आवड आणि रुची ब्लॉग विषयमाहिती
पुस्तके व साहित्य (Books and Literature Blog)पुस्तक किंवा कांदबरी याची समिक्षा आणि त्यासंदर्भात तुमचे आवलोक मांडण्यासाठी हा ब्लॉग विषय उपयुक्त आहे. तुम्हाला कविता आणि चारोळी लिहण्याचा धंद असेल तर तो संग्रह ब्लॉग द्वारा प्रकाशित करु शकता.
खेळ आणि गेमिंग ब्लॉग (Gaming and Puzzle)क्रिकेट, चेस, सुडोकू, व्हिडीओ गेम, कॅरम, घरामध्ये किंवा घराबाहेर खेळली जाणारे खेळ तसेच ऑनलाईन किंवा ऑफलाईन खेळली जाणारी गेमस् याची सर्व प्रकारची माहिती गेमिंग ब्लॉग द्वारे लिहता येते. यामध्ये गेमची समीक्षा, खेळण्याच्या शैली, मार्गदर्शन, गेमसची यादी, लाईव्ह स्ट्रिम असे अनेक माध्यमांचा वापर करता येतो.
गार्डनिंग ब्लॉग (Gardening)घरामध्ये, टेरेसवरती कशी वृक्षरोपन करावे? याचे मार्गदर्शन तसेच लहान जागेत आधुनिक शेती कशी करता येऊ शकते? यासंबधी मार्गदर्शनात्मक विषया नुसार लेखन करता येऊ शकतो. फळाची आणि रोपांची माहिती, ऋतुनुसार घ्यायची काळजी असे विषय यामध्ये मांडता येतात.
चित्रकला (Drawings)चित्रकला आणि पेंटिंग संबधीत मार्गदर्शन, उपयुक्त सुचना, रंगाची माहिती, डिजीटल ड्रॉईंग, स्क्रेचिंग, व्यांगचित्रे, फाटोग्राफी, कॅनव्हास, असे विषय चित्रकला ब्लॉग मध्ये समाविष्ट करु शकता.
नृत्य आणि गायन (Dancing & Singing)नृत्य काय आहे? किती प्रकारची नृत्य असतात? ति कशी शिकायची, भारतामध्ये आणि जगभरामध्ये कोणकोणते नृत्या प्रकार प्रचलित आहेत? याची माहिती देता येते. तसेच गायन आणि त्यासंबधीचे मार्गदर्शन, गायनातील बारकावे, गायकांचे साक्षात्कार, प्रसिद्ध गायक आणि त्यांची गायलेली गाणी या संदर्भात माहिती वाचकांना ब्लॉगिंग द्वारे उपलब्ध एक उत्तम विचार आहे.
Hobbies & Interests Blog Ideas in Marathi

5. स्वास्थ आणि आरोग्य (Health & Fitness Blog Ideas)

आरोग्य विषयी मार्गदर्शन करणारे आणि स्वस्थ जिवनशैली कशी नियोजित करु शकतो? संबधीत माहिती देणारे लेख म्हणजेच स्वास्थ आणि आरोग्य ब्लॉग होय. निरोगी आरोग्य, पोषण आहार, मानसीक स्वास्थ, व्यायाम, योगा… अश्या अनेक विषयावर ब्लॉगच्या माध्यमाने माहिती लिहता येऊ शकते.

आरोग्य संबधी ब्लॉग मध्ये सुचना, मार्गदर्शन आणि सखोल विवेचनचा समावेश असु शकतो ज्याचा उपयोग वाचकांना त्यांचे स्वास्थ आणि आरोग्य सुधारण्यास आणि दक्षता देण्यास मदत करु शकते. आहार संबधीत अनेक प्रकारचे अन्न, फळ, कडधान्य, सुकामेवा (Dry Fruits) त्यांचा उपयोग दैनंदिन जिवनामध्ये कश्या पद्धतीने करावयाचा या विषयी माहिती लिहु शकता.

स्वास्थ आणि आरोग्य ब्लॉग विषयमाहिती
योगा आणि व्यायाम (Yoga and Exercise)दैनंदिन जिवनामध्ये निरोगी अरोग्यासाठी व्यायाम आवश्यक असतो. योगा आणि व्यायाम सारख्या विषयावर मार्गदर्शन देणारे गाईड, प्रशिक्षण विषयी लिहु शकता जेणेकरुन वाचकांना त्याचा उपयोग आरोग्य सुधारण्यास मदत करु शकतो.
वजन कमी करणे (Weight Loss Tips)वजन कमी करणारे किंवा वजन नियंत्रण कसे करावे? संबधीत माहितीसह आहार आणि जिवनशैली संबधी माहिती देणारे लेख या सदरा खाली लिहता येतात.
मानसिक स्वास्थ् (Mental Health)मानसिक आरोग्य कसे जपावे, तणाव मुक्त जिवन, प्रेरणा दायक विचार किंवा गोष्ठीचा समावेश असणारे विषय या ब्लॉग आंतर्गत समाविष्ठ करु शकता.
थेरीपी (Therapies)शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी उपचार पद्ध्तीचा उपयोग होते. जसे ब्युटी थेरपी, फिजीओथेरपी विषयी लिहण्यात येणारे ब्लॉग या सदराआंतर्गत येतात. पंरतू अश्या प्रकारचे ब्लॉग विषय तज्ञ व्याक्तींद्वारे लिहलेली किंवा तपासलेली असतील तर उत्तमच!
पोषक आहार (Nutrition & Diet)स्वस्थ आरोग्यासाठी पोषक आहार आवश्यक असतो. पोषक आहारामध्ये फळ, भाज्या, अन्नधान्य, पोषक द्रव्ये असलेली पेय व पदार्थ, बाजारात मिळणारी पोषक उत्पादणे व इतर ब-याच गोष्टींचा समावेश होतो. पोषक आहारासंबधी माहिती देणा-या ब्लॉग मध्ये या विषयीचे ज्ञान आणि मार्गदर्शन दिलेले असते.
Health & Fitness Blog Ideas in Marathi

📌 Useful Tips : ब्लॉग लिहताना निवडलेल्या विषयाची अभ्यासक माहिती असणे आवश्यक असते किंवा तुम्ही त्या विषयाचे तज्ञ असाल तर उत्तमच. ब्लॉगद्वारे मार्गदर्शन करताना दिलेली माहिती अचुक असणे महत्वाचे आहे, संभ्रामक, खोटी किंवा शंका निर्मान करणारी माहिती देणे चुकिची आहे.

6. पालकत्व ब्लॉग (Parenting Blog Ideas in Marathi)

लहान मुंलाचे संगोपन, संस्कार, शिक्षण, आहार, स्वास्थ, मनोरंजन, खेळ… असे अनेक विषयांची माहिती देणारे मार्गदर्शक ब्लॉग एक उत्तम विषय आहे. एक पालक म्हणुन पाल्यसंबधी कोणकोणती कर्तव्य आणि जबाबदारी पुर्ण करावयाची असतात या विषयी लिहता येते. यामध्ये असणारे बारकावे, दिशादर्शक सुचना, चर्चा आणि मार्गदर्शन करणारे ब्लॉग लेखन तुमच्या माहितीला दिशा देऊ शकतात.

पालकत्व ब्लॉग सारखे नाजूक विषय हाताळताना अभ्यासात्मक माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. या विषयी लिहताना बालमन समजुन घेणे आवश्यक आहे. तसेच वयोमानानुसार होणारे मानसीक व शाररीक बदल, समोपदेशन सह लहान मुलांचे आहार, त्यांचे कपडे, शिक्षण, उत्पादणे, खेळणी अशी अनेक माहिती देणारे विषय सखोल पणे या ब्लॉग प्रकारमध्ये समाविष्ट करु शकतात.

पालकत्व ब्लॉग विषयमाहिती
मुलांचे कपडे (Baby Cloth)लहान मुलां-मुलींसाठी अनेक फॅशनेबल कपडे बाजारात उपलब्ध आहेत त्या विषयावर लिहु शकता. तसेच ऋतु नुसार असलेले पेहराव, सांस्कृती कार्यक्रमां मध्ये वापरण्यात येणारी कपडे,
मुलांची खेळणी (Baby Toys)घरात आणि बाहेर मैदानात खेळले जाणारे खेळ व खेळणी विषयक माहिती या सदराखाली प्रस्तुत करु शकता.
गृह शाळा (Home Schooling)शाळेत शिकवले जाणारे अभ्यासक्रम घरी कशी अध्ययन करावी?, वेगवेगळे विषयांचा अभ्यास कसा करुन घ्यायचा? चांगल्या सवयी, आपल्या संस्कृतीची माहिती, संस्कार, आदर, नातेसंबध, संभाषण, त्याविषयीचे मार्गदर्शन करणारे ब्लॉग या विषयांतर्गत लिहता येऊ शकतात.
गोष्ठी आणि कविता (Baby Story)प्रेरणात्मक, मनोरंजक आशय असलेले गोष्टी आणि कवितांचा समावेश असलेले सचित्र लेखन एक चांगला विषय आहे. तसेच कोडी, DIY सारख्या ॲक्टीव्हिटी देखिल या विषयांतर्गत समाविष्ठ करु शकता.
मुल आणि क्रियाशिल (Kids with Activity)गार्डनिंग, वाढदिवस, प्रवास, चित्रकला, गायन, स्नेह-सम्मेलनाचे विषयक माहिती, दिनचार्याचे अभ्यासासह वेळापत्रक, सुट्टयामध्ये असलेले गृहकार्य, क्राफ्ट कार्य, स्वंयरक्षा सुचना (Self Care Tips), शैक्षणिक गेमस् आणि गोष्टी असे विषय असलेली माहिती ब्लॉग पोस्ट द्वारे प्रसिद्ध करता येते जे पालकांसह मुलांना देखिल उपयोगी असेल.
Parenting Blog Ideas in Marathi

📌 Useful Tips : ब्लॉग लिहताना निवडलेल्या विषयाची अभ्यासक माहिती असणे आवश्यक असते किंवा तुम्ही त्या विषयाचे तज्ञ असाल तर उत्तमच. ब्लॉगद्वारे मार्गदर्शन करताना दिलेली माहिती अचुक असणे महत्वाचे आहे, संभ्रामक, खोटी किंवा शंका निर्मान करणारी माहिती देणे चुकिची आहे.

7. सौंदर्य विषयक ब्लॉग (Beauty Blog Ideas)

सौंदर्य व्याक्तिमत्वाचा महत्वाचा भाग आहे. सौंदर्य आणि राहणीमान एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. सौंदर्य आणि फॅशन आज सर्वात जास्त युवा पिढी साठी प्रचलित असलेले ब्लॉगचे विषय आहे. राहणीमान, ट्रेंडिंग फॅशन, सौंदर्य प्रसाधने, शुज, ग्लासेस, फेग्रेंन्सेस, हेअर स्टाईल… अश्या कितीतरी विषयावर स्वतंत्रणे माहिती देणारे ब्लॉग लिहता येऊ शकतात. आवडते कलाकार किंवा व्याक्ति कोणत्या टेंन्डस् चे अनुसरण करत आहेत त्यासंबधी अद्यावत माहिती वाचकापर्यंत ब्लॉग च्या माध्यमाने सहज देता येते.

ब्लॉगच्या विषयानुसार माहिती, सौंदर्य प्रसाधन उत्पादनांची परीक्षणे, सौंदर्य मार्गदर्शन, उत्पादनांची पर्याय, जवळपास होणारे फॅशन कार्यक्रम, समीक्षक माहिती लेखणीबद्ध करुन ब्लॉगद्वारे प्रकाशित करु शकतात, जे वाचकांसाठी मार्गदर्शक ठरु शकतात. सौंदर्य आणि फॅशनचे प्रेरणा स्त्रोत अनेक प्रकारचे असु शकतात.

सौंदर्य विषयक ब्लॉग विषयमाहिती
सौंदर्य प्रचलन (Beauty Trends)प्रचलित असलेले सौदर्य थेरपीज, मेकअप उत्पादने आणि त्या विषयक माहिती या ब्लॉग विषयांतर्गत समाविष्ट करु शकता.
सौंदर्य प्रसादणे (Cosmetics)सोंदर्य प्रसाधने संबधी माहिती, परीक्षणे, तुलनात्मक माहिती, रिव्ह्युव्ह, जागतिक आणि स्वदेशी उत्पादने या विषयींची माहिती, जागतिक स्तरावर सौंदर्य विषयक प्रचलन अशी आशय आणि माहिती असलेले ब्लॉग प्रकाशित करु शकतात.
स्किन & हेअर केअर (Skin & Hair care Tips) शॅम्युरा, केशांसाठी तेल, कंडिशनर, स्किन क्रिम, सारख्या प्रसिद्ध उत्पादनांची माहिती, त्वचेसाठी आणि केशांसाठी असणारी उत्पादना संबधीत माहिती, त्यासंबधीतचे तुमचे मत आणि अभिप्राय ब्लॉगद्वारे प्रस्तुत करु शकता. तसेच नैसगीक रित्या तयार केली जाणारी स्किन & हेअर केअर सामग्री तयार करणे आणि वापरण्या संबधित मार्गदर्शन आणि माहिती ब्लॉग मध्ये समाविष्ट करु शकतात.
मेकअप मार्गदर्शन (Makeup Guide)मेकअप कसे करावे? मेकअपचे प्रकार, इव्हेन्ट मेकअप, असे अनेक विषयीचे मार्गदर्शन आणि सुचना संबंधी लेख या सदरा आंतर्गत लिहता येतात.
Beauty Blog Ideas in Marathi

8. फॅशन ब्लॉग (Fashion Blog Ideas)

फॅशन म्हणजे फक्त पोषाख (Outfit) वापरण्यासंबधी मर्यादित नाही तर पुर्ण व्याक्तिमत्वाला सुशोभित करण्याचा मार्ग आहे. फॅशन ब्लॉग मध्ये पोषाख, ज्वेलरी, शुज आणि सँडल, रंगसंगती, चष्मे, फ्रेग्रेन्सेस, मेकअप, असे विषय समाविष्ट असतात. समारंभ, ऋुतू, संस्कृती, मान्यतानुसार फॅशन मध्ये विविधत आढळते त्यानुसार असे विषय समाविष्ट असलेले ब्लॉग लिहता येतात. तसेच जगामध्ये अनेक देश आहेत त्या देशामध्ये संस्कृती, धर्म, प्रचलन नुसार फॅशन कश्या पद्धतीने आत्मसात केलेली आहे त्या विषयावर देखिल सखोल अभ्यासात्मक लेख लिहणे उत्तम विचार आहे.

फॅशनचे मुळात अनेक स्त्रोत आहेत जसे कलाकार, सिने-कलाकार, सेलेब्रेटी, फॅशन डिझायनर, जे नविन फॅशन संकल्पनांचा अविष्कार करत असतात तसेच नव-नवीन फॅशन समाजात प्रचलित करत असतात. फॅशनमुळे उद्योग क्षेत्र, समाज, देश, आणि राहणीमान कसे प्रभावित होत असतात? अश्या चौफेर विषयावर फॅशन ब्लॉग द्वारे वाचकांना माहिती दिली जाते.

फॅशन ब्लॉग विषयमाहिती
प्रचलन आणि फॅशन (Trends and Fashion)वर्तमानकाळात प्रचलित असलेले फॅशन या विषयावर ब्लॉग लिहता येतात. अनेक देशामध्ये असलेली संस्कृती आणि प्रचलन नुसार फॅशन कश्या पद्धतीने आत्मसात केलेली आहे त्या विषयावर देखिल सखोल अभ्यासात्मक लेख लिहणे उत्तम विचार आहे.
फॅशन समीक्षा (Fashion Reviews)फॅशन ट्रेन्डस्, कपडे, शुज, ज्वेलरी, वॉचेस, ब्रॅन्ड कलेक्शन, वेअरेबल फॅशन, फॅशन प्रोडक्ट, कलर पॅलेटस्, संबधित माहिती देणारी वेबसाईट, मार्गदर्शन् आणि समिक्षा सारखे विषय या आंतर्गत लिहता येतात.
वयक्तीक लाईफ स्टाईल (Lifestyle)फॅशन ब्लॉगर म्हणुन तुम्ही तुमच्या वयक्तीक स्तरावर वापरली जाणारी फॅशन, आऊटफिट, डिझायनर कलेक्शन संबधित माहिती या ब्लॉगद्वारे वाचकांना देऊ शकतात. तसेच तुमचे आवडते डिझायनर, सेलिब्रेटी फॅशन या विषयी देखिल लिहता येतात.
कार्यक्रम आणि पोषाक (Occasions Clothing and Accessory)लग्नसंमारंभ, वाढदिवस, सांस्कृतीक आणि धर्मीक कार्यक्रम आणि विषेश समारंभामध्ये सध्याचे प्रचलित आणि वापरण्यात येणारे फॅशन विषयी माहिती देणारे ब्लॉग लिहता येतात.
ऋतू आणि फॅशन (Seasonal Outfit and Fashion)ऋतु नुसार प्रचलीत असलेले पेहराव आणि त्यासंबधीम फॅशन संबधीत माहिती देणारे ब्लॉग या विषयांतर्गत लिहलेली असतात. अश्या प्रकारचे ब्लॉग खासकरुन अश्या वाचकांसाठी उपयुक्त असतात जे ऋतू नुसार फॅशन किंवा आऊटफिट वापरणे पसंद करतात.
Fashion Blog Ideas in Marathi

9. प्रवास वर्णन ब्लॉग (Travel Blog Ideas)

प्रवासवर्णन ब्लॉग (Travel Blog) मध्ये संपुर्ण प्रवासाचा वृत्तांत वर्णन केलेले असते. समजा तुम्ही एखाद्या प्रेक्षणिय स्थळी भेट दिली असेल त्या प्रवासामध्ये मध्ये आलेले अनुभव, प्रवासाचे साधन, त्या ठिकाणचे प्रेक्षणिय स्थळे, जेवन, संस्कृती, लोक, इतिहास अश्या अनेक वैशिठ्यांचा वर्णन ब्लॉग द्वारे करु शकता.

प्रवासासोबतचे तुम्ही व्हि.डी.ओ. लॉग, त्या स्थळाचे फोटोज्, हॉटेलची माहिती, राहण्याची आणि खाण्याची व्यावस्था असे विषय देखिल समाविष्ट करु शकता. प्रवास वर्णन ब्लॉगचा हेतू फक्त वर्णणात्मक माहिती लिहण्यापर्यंत मर्यादित नाही तर प्रवासाचा संपुर्ण वृत्तांत मार्गदर्शक आणि माहिती देणारा असणे आवश्यक आहे. जेणेकरुन वाचकांना त्या संबधी आधिक माहिती मिळु शकेल जे त्या ठिकाणच्या भेटिसाठी मार्गदर्शन आणि उपयुक्त असेल.

प्रवास वर्णन ब्लॉग विषयमाहिती
प्रवास वृतांत (Travel log)टॅव्हल लॉग मध्ये एखाद्या ठिकाणी दिलेल्या भेटिचा संपुर्ण वृतांत दिलेला असतो. यामध्ये प्रवासाठी निवडलेले रस्ते, प्रवासाचे साधन, हॉटेल, जेवन, वातावरण, नदी-तलावांची माहिती, त्या ठिकाणचे जिवनमान, प्रवासामध्ये आलेले अनुभव, प्रेक्षणिय स्थळांचे फोटोज्, अश्या अनेक घटकांसह प्रवास वर्णन ब्लॉगच्या स्वरुपात लिहु शकता.
स्थानिक प्रवास (Local Travelling)तुम्हीज्या ठिकाणी राहता त्या गावाचे, जिल्ह्याचे, राज्याचे महत्व सांगणारे, प्रेक्षणिय स्थळे, संस्कृती, ऐतिहासीक महत्व, रुढी-परंपरा, चाली-रीती, प्रसिद्ध जेवन, प्रवासाचे मार्ग इतिहास संबधी माहिती ब्लॉग द्वारे देऊ शकता.
गढ आणि किल्ले विषयक ब्लॉग (Heritage site Visit)भेट दिलेल्या गढ आणि किल्ले विषयक माहितीमध्ये त्या ठिकाणचा इतिहास, महत्व, गढ आणि किल्ले यांची स्थिती असे प्रवास वर्णन करण्यासाठी या विषयाचा आधार घेऊ शकता.
कला आणि संस्कृती (Art and Culture)कला क्षेत्र, धर्मीक स्थळ आणि संस्कृतीक स्थळांना दिलेल्या भेटिचे वर्णन या विषयांतर्गत करता येतो. यामध्ये त्या विषयींचा इतिहास, मान्यता, महत्व असे संदर्भसह लिखान करता येते.
विदेश प्रवास वर्णन – (Abroad Information)जगामध्ये वेगवेगळ्या देशांना दिलेल्या भेटिंचा वृत्तांत लिहता येतो. भेट दिलेले देश, त्या ठिकाणची भाषा, संस्कृती, खानपान, वेषभुषा, चालीरीती, परंपरा, धर्म, प्रेक्षणिय स्थळे, देशाचा इतिहास अश्या अनेक गोष्टींचा उल्लेख ब्लॉगद्वारे प्रस्तुत करता येतो.
Travel Blog Ideas in Marathi

10. फाईनैन्स (Finance Blog Ideas)

आर्थिक विषय असलेले ब्लॉग मध्ये पैसा कमावणे, गुंतवणूक, बचत, खर्च आणि पैशाचे उत्तम व्यावस्थापन विषया संबधी माहिती दिलेली असते. रोजगार आणि नौकरीच्या संधी, त्यासंबधी मार्गदर्शन, पैसे कमवायचे माध्यम आणि त्यांची गुतवणूक करण्याचे मार्गदर्शन करणारे लेख ब्लॉगच्या माध्यमाने प्रकाशित करु शकतात.

शेअर मार्केट संबधीत विस्तारीत माहिती त्या विषयीचे प्राथमिक माहिती असणारे ब्लॉग, कर्ज, विमा, कर आणि अर्थशास्त्रीय संकल्पना संबधित माहीती प्रदान करणारे लेख एक उत्तम ब्लॉग विषय आहे.

फायनानस ब्लॉग विषयमाहिती
शेअर मार्केट (Share Market)शेऊर मार्केट संबधी माहिती देणारे, गुंतवणुक, जोखिम, असे विषय या आंतर्गत लिहता येतात. शेअरची खरेदी-विक्री, गुंतवणुन सारख्या विषयावर माहिती देणारे तुम्ही अधिकृत व्याक्ति असणे आवश्यक आहे.
पर्सनल फाईनैन्स (Personal Finance) दैनंदिन पैशाचा हिशोब कश्या पद्धतीने नियंत्रीत करावयाचा, पैसा कसा कमावायचा आणि कश्या पद्धतीने खर्च करायचा लेखा-जोखा या संबधी माहिती आणि मार्गदर्शन वरती ब्लॉग पर्सनल फायनान्स आंर्तगत लिहता येतात.
कर्ज आणि विमा (Loan and Insurance)बँकाद्वारे उपलब्ध होणारी कर्जे, व्याजदर, सिबील स्कोर संबधीत माहिती, विमा काय असतो?, त्याचे फायदे तसेच बँकिंग आणि विमा संबधित माहिती आणि मार्गदर्शन ब्लॉग द्वारे लिहली जाऊ शकतात.
Finance Blog Ideas in Marathi

सारांश

एक ब्लॉगर म्हणुन ब्लॉगची सुरवात करण्यापुर्वी तुम्ही निवडलेल्या विषयानुसार लेखन शैली विकसीत करा. ब्लॉगमध्ये स्वता:च्या शब्दांचा वापर करा, चित्रांचा वापर आवश्य तेथे जरुर करा. शिक्षण, तंत्रज्ञान, आणि प्रवासवर्णन, आवड आणि रुची… असे एकुन 10 प्रचलित विषयांची माहिती विस्तृतपणे दिली आहे जे तुमच्या ब्लॉगचा विषय निवडण्यास मदत करतील.

शेअर करा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *