सगंणकाचे एकक – बिट बाईट म्हणजे काय?

आज सर्रासपणे आपण सगंणक किंवा मोबाईलच्या संग्रहन क्षमतेबाबत KB, GB, TB अशी संकल्पना वापरतो आणि बोलतो. परंतू KB किंवा GB मुळात काय असते ? आणि हे कश्या पद्धतीने अंकित करतात किंवा मोजतात ? Bit Byte Marathi Information या विषयाची माहिती “सगंणकाचे एकक” या ब्लॉग मध्ये घेणार आहोत तर चला सुरवात करुया… याची आपण आज माहीती घेऊ

एकक काय असतो? – Unit of Memory in Marathi

एकक…. परीमान मोजण्यासाठी वापरली जाणारी संकल्पना. जसे कि आंतर मोजण्यसाठी किलो-मिटर, द्रव पदार्थ मोजण्यासाठी लिटर व जड पदार्थ मोजण्यासाठी किलो-ग्राम असे एकक आपण वापरतो. अगदी त्याच पद्धतीने संगणकाची माहीत मोजण्यासाठी असे काही एकक आहे का? तर संगणकाची माहीत म्हणजेच त्याला आपण “डेटा” असे म्हणतो त्याला मोजण्यासाठी “बिट” असे एकक वापरले जाते.

bit byte marathi

सगंणकाचे एकक आणि कार्यपद्धती

मानव संभाषणाकरीता भाषा, हावभाव व भावनांचा माध्यम म्हणुन वापर करतो. म्हणजेच भाषेचा वापर करुन विनंती, आज्ञा, किंवा अश्या अनेक क्रिंया करत असतो. दोन‍ किंवा अधिक व्याक्तीशी संभाषण करण्यासाठी “भाषा” माध्यम म्हणुन वापरली जाते. जगभरामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. यामध्ये हिंदी, मराठी, इंग्रजी…. या सारख्या अनेक भाषांचा समावेश होतो.

संगणकाने काय करावे? या साठी मानव संगणकाला आज्ञा देतो किंवा विनंती करतो. म्हणजेच संगणकाशी संभाषण करत असतो. यासाठी तो “भाषा” माध्यमाचा वापर करतो. जशी “इंग्रजी” मानवी भाषा आहे तशीच “बायनरी” ही संगणक भाषा आहे. इंग्रजी मध्ये संभाषणासाठी 32 अल्फाबेटस वापरली जातात तशीच संगणकामध्ये 0 व 1 अशी अंकशास्त्रीय संकल्पना वापरली जाते.

आपणास संभाषणासाठी शब्द किंवा वाक्य इंग्रजीतील 32 अल्फाबेटसचा वापर करुन तयार करावी लागतात किंवा त्यांचा वापर करुन बोलावी लागतात. तसेच संगणक 0 व 1 या अंकाचा वापर करुन संभाषण करत असतो. संगणकाला इंग्रजी व इतर मानवी भाषा वाचला येत नाही किंवा समजत नाही त्याच पद्धतीने मानवाला संगणकाची “बायनरी” सारखी भाषा समजत नाही किंवा वाचता येत नाही.

यावर पर्याय म्हणुन संगणक व मानव यामधील संभाषणासाठी दुवा तयार करण्यात आला. हा दुवा भाषातराचे कार्य करत असतो. म्हणजेच मानवी भाषेचे रुपांतर संगणक भाषेत आणि परत संगणक भाषेचे भाषातंर मानवी भाषेत करत असतो. भाषांतर करणारी मायक्रोप्रोसेसर सारखी यंत्रणा निरंतर या प्रकारच्या प्रक्रिया करत असतात. आज्ञा, सुचना, माहिती अश्या अनेक प्रकारच्या माहितीचा यामध्ये समावेश होता.

मानवाने संगणकाला दिलेली माहीती किंवा आज्ञा हे मानवाला समजतील अश्या स्वरुपात असताता जसे मानव संगणकाचा वापर करुन काही अक्षरे टाईप करतो तेव्हा ती इंग्रजी अक्षरी असतात जे कि मानवी भाषा असते. यावरती संगणकाचा CPU हा भाग प्रक्रिया करतो व प्रथम ती माहीती “बायनरी” म्हणजेच संगणकीय भाषेमध्ये बदलतो व अज्ञा किंवा विनंती समजुन घेतो. या माहितचे उत्तर परत CPU ला पाठवतो आणि CPU परत तो मानवी भाषेमध्ये बदलतो जेणेकेरुन तो आपणास समजेल …. आणि अश्या प्रकारे आपण टाईप केलेली अक्षरे संगणक स्क्रिन वरती प्रदर्शीत करतो. या प्रकारची माहिती आपणास समजेल अश्या स्वरुपात असते.

बिट्स आणि बाईटस् काय असतात? – Bit Byte Marathi Mahiti

सगंणक आणि डिजीटल तत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये माहिती किंवा डेटा मोजण्याच्या एककाला बिट असे म्हणतात. डिजीटल स्वरुपामध्ये असलेली कोणत्याही प्रकारची माहिती/डेटा सगंणकाचे एकक बिट्स आणि बाईटस् या बेसिक एकका मध्ये मोजला जातो. ज्या प्रमाणात बिट किंवा बाईट यांची संख्या वाढत जाते त्यानुसार विशीष्ट बिटच्या समुहाला नावे दिलेली आहेत त्यासंबधी माहिती पुढील प्रकारे सुचिबद्ध करत आहोत.

1. बिट म्हणजे काय? – What is Bit?

  • बायनरी डिजीट या शब्दाचे लघुरुप म्हणजे बिट (Bit-Binary Digit or Binary Information Digit) होय.
  • 0 आणि 1 या दोन बायनरी डिजीटचा वापर द्विमान पद्धतीमध्ये वापरला जातो.
  • 0 आणि 1 यांची व्हॅल्यु बंद आणि चालु या संकेतामध्ये मोजली जाते.
  • संगणकाला दिलेल्या माहितीच्या एककाला बिट असे म्हणतात.
  • शब्द किंवा आज्ञा म्हणजे अनेक बिटचा संच असतो. एका संकेतामध्ये आठ बिट वापरली जातात.
  • बिट एक प्रकारचे एकक आहे जे संगणकला दिलेल्या माहितीचे स्वरुप मोजण्यासाठी वापरले जाते.
  • बिट संगणकाच्या माहितीचे सर्वात लहान व प्राथमिक एकक आहे.
  • bit एकक मोजताना इंग्रजी कॅरेक्टर मधील लहान Small “b” द्वारे दर्शवले जाते. उदा Kb=Kilobit

2. बाईट म्हणजे काय? – What is Byte in Marathi?

  • आठ 8 बिटच्या समुहाला बाईट असे म्हणतात.
  • बाईट एक संपुर्ण युनिट आहे
  • सगंणकाची सर्व युनिट बाईट या एककामध्ये माजली जातात जसे KB-Kilo Byte, MB- Mega Byte, GB- Giga Byte, TB-Tetra Byte इ.
  • Byte एकक मोजताना इंग्रजी कॅरेक्टर मधील मोठे Capital “B” द्वारे दर्शवले जाते. उदा KB=Kilobyte

3. निबल म्हणजे काय?

  • चार बायनरी डिजीटच्या (Bit-Binary Digit) म्हणजेच 4 बिटच्या समुहाला निबल (Nibble) असे म्हणतात.
  • 1 Byte=2 Nibble एका बाईट मध्ये दोन निबल असतात म्हणजेच एकुन 8 बिट आसतात.

4. किलोबाईट म्हणजे काय? – What is KB (Kilobyte)?

  • किलोबाईट शब्दाचे लघुरुप म्हणजे KB – Kilobyte होय.
  • एका किलोबाईटमध्ये एकुन 1024 Byte असतात.
  • साधारण प्रकारचे टेक्स्ट डॉक्युमेंट किंवा वेब पेज Kilobyte मध्ये असतात.

5. मेगाबाईट म्हणजे काय? What is MB (Megabyte)?

  • MB या माहिती एककाच्या विस्तृत रुपाला Megabyte असे म्हणतात.
  • एका मेगाबाईट मध्ये 1024 किलो बाईट असतात. 1MB=1024 KiloByte
  • इमेजेच, डॉक्युमेंट आणि संगित फाईल्स् साधारणत: मेगाबाईट मध्ये असतात.

6. गिगाबाईट म्हणजे काय? – What is GB (Gigabyte)?

  • गिगाबाईट Gigabyte चे संक्षिप्त रुप GB आहे.
  • एका GB मध्ये एकुन 1024 मेगाबाईट असतात. 1GB=1024 MegaByte
  • मुव्हिज, ॲप्लीकेशन यांची डेटा एकक ‍GB मध्ये असु शकते.
  • डेस्कटॉप, लॅपटॉप, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह या प्रकारच्या संग्रहन साधनांची क्षमता साधारणपणे GigaByte मध्ये मोजली जाते. उदा. 1 GB, 256 GB, 512 GB…
  • इंटरनेटची गती/स्पीड GBps किंवा Gbps मध्ये मोजली जाते. उदा. GBps – GigByte Per Second or Gbps – Gigbit Per Second

7. टेराबाईट म्हणजे काय? – What is TB (Terabyte)?

  • टेराबाईट Terabyte चे संक्षिप्त रुप TB असे आहे.
  • एका TB मध्ये एकुन 1024 गिगाबाईट असतात. 1TB=1024 Gigabyte
  • डेस्कटॉप किंवा लॅपटॉपची एकुन संग्रहन क्षमता GigaByte मध्ये मोजली जाते. उदा. 1 TB, 2 TB, 4 TB…
malware in marathi virus antivirus

सगंणक युनिट – Unit of Computer Memory

संगणकाचे युनिट सोप्या भाषेमध्ये समजण्याकरीता खालील टेबल स्वरुपामध्ये माहिती दिलेली आहे ज्याद्वारे वर दिलेली माहिती समजण्यास सोपे जाईल.

Unit=UnitShort FormLong FormUnit
0 Or 1 1 bitBitBinary Digit0 and 1
4 Bit=1 NibbleNibNibble4 Bit
8 Bit=1 Byte  8 Bit
1024 Byte=1 KBKBKilo Byte10241
1024 KB=1 MBMBMegaByte10242
1024 MB=1 GBGBGigaByte10243
1024 GB=1 TBTBTeraByte10244
1024 TB=1 PBPBPetaByte10245

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *