वापरकर्त्याने संगणकाला प्रविष्ट केलेली सुचना, आज्ञा किंवा माहितीचे अंतिम स्वरुप प्राप्त करण्यासाठी संगणका मार्फत होणारी क्रिया म्हणजेच “प्रोसेस/ प्रक्रिया” होय. डिव्हाईस संगणकाचा दिसणार भाग असतो जो विजेवर चलणारी घटक असतात. संगणकाला माहिती देणे आणि प्राप्त करण्यासाठी डिव्हाईस महत्वाची असतात. इनपुट, प्रोसेस आणि आऊटपुट डिव्हाईस असे वर्गीकरण केले जाते.
संगणक द्वारे डेटावर प्रक्रिया करण्यासाठी डिव्हाईस (Hardware) आणि सॉफ्टवेअर (Software) हे दोन्ही घटक आवश्यक असतात. संगणकाची कार्यपद्धती इनपुट, प्रोसेस आणि आऊटपुट या तिन स्तरावरती कार्य करते. पुर्वीचे ब्लॉग “इनपुट डिव्हाईस | संपुर्ण माहिती” या भागामध्ये इनुपट म्हणजे काय? या विषयीची माहिती दिलेली आहे. प्रस्तुत ब्लॉग मध्ये संगणक प्रक्रिया विभाग आणि प्रक्रिया साधने या विषयीची माहिती अभ्यासाणार आहोत.
अनुक्रमनिका
प्रोसेस म्हणजे काय? | Process Marathi Meaning
संगणकाला प्राप्त झालेल्या डेटाचे विश्लेषन करुन अंतिम उत्तर प्राप्त करण्याच्या पद्धतीला प्रोसेस म्हणजेच प्रक्रिया असे म्हणतात. प्रोसेस क्रियेसाठी संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही घटकांची आवश्यकता असते. कमांड, सुचना किंवा कोणतेही माहितीचे अंतिम स्वरुप प्रक्रियेनंतर निश्चीत होत असते.
इनपुट डिव्हाईस द्वारे दिलेला डेटा ऍप्लीकेशन द्वारे वापरला जातो. ऍप्लीकेशन मध्ये जरी प्रक्रिया झालेल्या माहितची अंतिम स्वरुप प्राप्त होत असले तरी संगणकाची प्रोसेसिंग डिव्हाईस त्या डेटाला अंतिम स्वरुप देण्याचे कार्य करते.
उदा. संगणक वापरकर्ता जेव्हा किबोर्ड मार्फत नोटपॅड ऍप्लीकेशन मध्ये टेक्स्ट टाईप करतो किंवा कमांड निवडतो या प्रत्येक क्रियाचे प्राप्त होणारे अंतिम परीणाम किंवा स्वरुप प्रोसेसिंग डिव्हाईसद्वारे निश्चीत होत असते.
संगणक आणि मानवी भाषा दोन्ही भिन्न आहेत. मनुष्य संगणकाला डेटा देतो तो त्याला अवगत असलेल्या भाषेमध्ये असतो. मनुष्याने प्रविवष्ट केलेला डेटा संगणक भाषेत रुपांतरीत करतो आणि सुचना आणि आज्ञानुसारे त्याचे परीणाम पुन: मानवी भाषेत रुपांतरीत करतो जो अंतिम निष्कर्श किंवा अंमित माहिती असतो. वरील स्पष्ट केलेली सर्व क्रिया म्हणजेच प्रोसेस होय.
प्रोसेसिंग युनिट काय असतो? | What is Processing Unit?
संगणकाचे सर्व प्रक्रिया क्रिये संबधित व्यावस्थापन, स्मृती व साठवण आणि नियंत्रण ज्या विभागाद्वारे पुर्ण केली जातात त्या विभागाला प्रोसेसिंग युनिट म्हणतात. प्रोसेसिंग युनिट आंतर्गत अनेक प्रोसेसिंग डिव्हाईसचा समावेश होतो जे समन्वयाने डेटावर प्रक्रिया करण्याची भुमिका पार पाडत असतात.
प्रोसेसिंग युनिट कसे कार्य करते? | Processing Unit Marathi
1. सि.यू. – कंट्रोल युनिट
नियंत्रण विभाग सि.यू. (C.U. – Control Unit) संगणकाचा नियंत्रण कक्ष आहे जो संगणकामध्ये येणा-या व जाणा-या माहितीला नियंत्रित करण्याचे आणि व्यावस्थापनाचे कार्य करत असतो. माहिती किंवा डेटा कोणत्या माध्यमाने संगणकामध्ये आलेली आहे आणि कोणत्या माध्यमावरती माहिती पाठवायची आहे यांचे नियत्रण या विभागद्वारे पुर्ण केले जाते.
2. ए.एल.यु. – अर्थंमॅटिक ॲन्ड लॉजिक युनिट
ए.एल.यु. (A.L.U. – Arithmetic and Logical Unit) या विभागामध्ये गणिती आणि तर्क सारख्या प्रक्रिया करण्यात येतात. गणिती प्रक्रियामध्ये गुणाकार, भागाकार, वजाबाकी व बेरिज आणि तर्क (Logic) सारख्या प्रक्रियांचा समावेश होतो. कॉम्प्यूटर हा विचार करू शकत नाही. तो फक्त ए.एल.यु. नुसार कार्य करत असतो. गणिती प्रक्रिया किंवा तर्क सारख्या माहितीवर हा विभाग कार्य करतो. मायक्रोप्रोसेर हा संगणकाचा मेंदु आहे.
संबधित ब्लॉग
3. एम. यु. – मेमरी युनिट
संगणकाच्या स्मृती विभागामध्ये संगणकाती सर्व माहिती म्हणजेच डेटा साठवला जातो. माहिती किंवा डेटा मध्ये प्रक्रिया पुर्वीची डेटा आणि प्रक्रिया पुर्ण झालेला डेटा साठवण्यससाठी मेमरी युनिक कार्य करते. संगणकाच्या मेमरी युनिटचे (M.U. – Memory Unit) दोन भाग आहेत. प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी असे दोन भागाद्वारे माहितीचे संकलन आणि साठवण केले जाते.
प्रोसेसिंग डिव्हाईस म्हणजे काय? | Processing Devices in Marathi
प्रोसेसिंग डिव्हाईसचे प्रकार | Types of Processing Devices
1. मदरबोर्ड (सिस्टीम बोर्ड)
मदरबोर्ड (Motherboard Processing Device) प्रोसेसिंग क्रियेमधील सर्वात महत्वाच्या संगणक हार्डवेअर पैकि एक आहे. मदरबोर्डला सिस्टीम बोर्ड देखिल म्हणतात कारण संगणकाचे सर्व डिव्हाईसेस म्हणजेच हार्डवेअर मदरबोर्ड वरती जोडली जातात. मदरबोर्डवरती गुतागुंतीची सुक्ष्म तारेची रचना कलेली असते ज्याला बस लाईन म्हणतात ज्याद्वारे डेटाचे वहन केले जाते. तसेच एक डिव्हाईस इतर अनेक डिव्हाईसेस सोबत बस लाईनद्वारे जोडलेली असतात.
मदरबोर्ड वरती रॅम आणि रोम मेमरी, सिपीयु, स्टोरेज साधणे तसेच साऊंड आणि ग्राफिक्स कार्ड सारखी अनेक डिव्हाईस जोडली जाऊ शकतात. मदरबोर्डच्या मागील बाजूस किबोर्ड, माऊस, व्हिजीए, लॅन आणि युएसबी पोर्ट असतात ज्याद्वारे अनेक डिव्हाईसेस जोडली जाऊ शकतात.
2. सि.पी.यु. (सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट)
सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट युनिट म्हणजेच सि.पी.यु. (CPU Processing Device) डेटावर प्रकिया करणारे महत्वाचे हार्डवेअर आहे. सि.पी.यु. ला मायक्रोप्रोसेसर देखिल म्हणतात जो संगणकाची बुद्धि म्हणुन ओळखला जातो. सि.पी.यु. दिसायला एक प्रकारच्या चिप सारखे असते ज्यावरती सुक्ष्म बिंदु असतात. सि.पी.यु. डिव्हाईसेस मदरबोर्डच्या “सि.पी.यु. स्लॉट” मध्ये घट्ट बसवली जाते.
सि.पी.यु.चे कार्य तिन स्तरावरती विभागता येतात अनुक्रमे कंट्रोल युनिट, अर्थंमॅटिक ॲन्ड लॉजिक युनिट आणि मेमरी युनिट. कंट्रोल युनिट सर्व विभागावर आपले नियंत्रण करण्याचे कार्य करतो. गणिती आणि तर्क सारख्या प्रक्रिया अर्थंमॅटिक ॲन्ड लॉजिक युनिट द्वारे पुर्ण होतात. संगणक डेटा साठवण आणि व्यावस्थापन मेमरी युनिट विभाग हाताळत असतो.
3. जि.पी.यु. (ग्राफिक्स् प्रोसेसिंग युनिट)
जि.पी.यु. म्हणजे ग्राफिक्स् प्रोसेसिंग युनिट होय. संगणकावरती प्रदर्शीत होणारे ग्राफिक्स किंवा व्ह्युज्वल घटकांवरती प्रक्रिया करणारे विभाग आहे. संगणक मदरबोर्डवरती साधारणपणे जि.पी.यु. (GPU Processing Device) डिव्हाईसेस चिपच्या स्वरुपात उपलब्ध असतात आणि उच्च प्रतिचे जि.पी.यु. मदरबोर्डवरील स्लॉट मध्ये घट्ट बसवली जातात.
जि.पी.यु. डिव्हाईसेस चित्र आणि व्हिडीओचा स्पष्टता, उच्च दर्जा आणि जलद गतिने प्रक्रिया करण्यास सक्षम असतात. जि.पी.यु. चा उपयोगा उच्च प्रतिच्या ग्राफिक्स डिझाईन, व्हिडीओ एडिटींग आणि 3D ॲनिमेशन सारख्या कार्यासाठी केला जाते.
4. रॅम (रॅन्डम ऍक्सेस मेमरी)
प्रायमरी मेमरी तात्पुरत्या स्वरुपाची मेमरी असते याला रॅम (RAM-Random Access Memory) असे म्हणतात. रॅम मध्ये संगणकाने प्रक्रिया न केलेली आणि प्रक्रिया पुर्ण केलेली माहीती साठवली जाते. संगणक जोपर्यंत चालू आहे तो पर्यंत यामध्ये माहिती सुरक्षित असते संगणक बंद केल्यानंतर रॅम मेमरी मधील माहिती पुसली जाते म्हणुन याला तात्पुरती मेमरी म्हणतात.
5. रोम (रिड ओन्ली मेमरी)
रोम मेमरी ला रिड ओन्ली मेमरी असे म्हणतात कारण रोम मेमरी असलेला डेटा संगणकाला फक्त वाचता येतो तो बदलता अथवा पुसता येत नाही. रोम मेमरीला कायमस्वरुपी मेमरी (Non-Volatile Memory) म्हणुन देखिल ओळखले जाते. संगणक जेव्हा चालू केला जातो तेव्हा संगणक सुरवात होण्यासाठीची सर्व प्राथमिक माहीती रोम मेमरी मध्ये साठवलेली असते. संगणक हार्डवेअर, फर्मवेअर आणि सिस्टीमच्या महत्वाच्या सेटिंगस् रोम मेमरीमध्ये स्टोर केलेली असतात.
6. साऊंड कार्ड
आवाज म्हणेजच ध्वनी स्वरुपांच्या डेटावर प्रक्रिया किंवा कार्य करण्यासाठी साऊंड कार्ड (Sound Processing Devices) वापरली जातात. उच्च प्रतिचे ऑडिओ इनपुट आणि आऊटपुट साठी साऊंड कार्डचा सर्वाधिक उपयोग होतो. म्युजिक, गेम, व्हिडीओ व इतर प्रकारच्या ऑडिओ प्रोसेसिंग कार्य संबधित साऊंड कार्ड वापरली जातात.
साऊंड कार्ड प्रामुख्याने दोन प्रकारची येतात त्यापैकि इंटीग्रेटेड साऊंड कार्ड मदरबोर्डवरील चिपच्या स्वरुपात असतात जे सामान्य ऑडिओ उपयोगिते करता वापरली जातात. डेडिकेटेड साऊंड कार्ड उच्च दर्जाची ऑडिओ वरती कार्य करण्याकरीता वापरली जातात तसेच मदरबोर्डवरील PCI स्लॉट मध्ये जोडली जातात.
7. नेटवर्क कार्ड
संगणक कार्यजाळे म्हणजेच नेटवर्क तयार करण्यासाठी “नेटवर्क कार्ड” (Network Processing Devices) चा उपयोग होतो. एकापेक्षा अनेक संगणक नेटवर्क कार्डच्या सहय्याने जोडली जातात. नेटवर्क कार्डला ‘लॅन कार्ड’ किंवा ‘ एन.आय.सी (NIC – Network Interface Card)’ देखिल म्हणातात.
नेटवर्क कार्ड संगणकाला एकमेंकासोबत संवाद सक्षम जोडणी उपलब्ध करुन देतो. नेटवर्क कार्ड द्वारे लॅन आणि इंटरनेट सारख्या सुविधा वापरता येतात ज्याद्वारे डेटा आणि माहिती विभागुन वापरता येते.
8. मोडेम
मोडेम हा शब्द मॉड्युलेटर-डिमॉड्युलेटर (Modem – Internet Devices) या दोन शब्दा पासुन बनलेला आहे. टेलीफोन लाईन, केबल, मोबाईल जोडणी आणि सेटेलाईट द्वारे प्राप्त होणा-या ॲनालॉग डेटाचे रुपांतर डिजीटल डेटामध्ये करण्याचे कार्य मोडेम द्वारे केले जाते. संगणक आणि इतर डिजीटल साधनांमध्ये संभाषणासाठी मोडेम आवश्यक असतात ज्याद्वारे इंटरनेट सारखी संभाषण सेवा वापरली जातात.